स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय ‘विभाजन विभीषिका स्मृति दिन ‘ साजरा
1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय ‘विभाजन विभीषिका स्मृति दिन ‘ साजरा

Loading

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय ‘विभाजन विभीषिका स्मृति दिन ‘ साजरा

जळगाव – स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय एम जे कॉलेज येथे ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ साजरा करण्यात आला.यावेळी 1947 च्या भारत व पाकिस्तान फाळणी दरम्यान झालेल्या हिंसाचारात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रा संदीप वानखेडे यांनी फाळणी दरम्यान असलेली पार्श्वभूमी व त्यानंतर झालेल्या दुदैवी हिंसाचाराची माहिती दिली. तत्कालीन घटनेमध्ये ग्रस्त असलेल्या वेगवेगळ्या प्रांतातील नागरिक व त्यांच्या व्यथा त्यांनी संक्षिप्तात मांडल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ रणजीत पाटील यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य आर. बी. ठाकरे,पर्यवेक्षिका प्रा स्वाती बऱ्हाटे ,समन्वयक प्रा उमेश पाटील, प्रा संध्या महाजन व प्रा गणेश सूर्यवंशी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *