धुळे महानगरात महावितरणाचे कार्यकारी अभियंता श्री जितेंद्र महाजन यांचे भव्य स्वागत , अखिल भारतीय माळी महासंघाकडून मानाचा सन्मान व हार्दिक शुभेच्छा
![]()
धुळे महानगरात महावितरणाचे कार्यकारी अभियंता श्री जितेंद्र महाजन यांचे भव्य स्वागत ,
अखिल भारतीय माळी महासंघाकडून मानाचा सन्मान व हार्दिक शुभेच्छा
धुळे (प्रतिनिधी):
माळी समाज हा नेहमीच समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र बांधून ठेवणारा, प्रत्येक क्षेत्रात योगदान देणारा म्हणून ओळखला जातो. शासन सेवेत वा इतर कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाजबांधवांचा सत्कार, सन्मान आणि शुभेच्छा देण्याचे कार्य अखिल भारतीय माळी महासंघ सातत्याने करीत आहे.
याच परंपरेत आज धुळे महानगर महावितरण (MSEB) विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या श्री जितेंद्र विठोबा महाजन यांचा मानाचा सन्मान करण्यात आला.
जिल्ह्याचे सुपुत्र असलेले श्री महाजन यांच्या हातून आपल्या जिल्ह्याची, शहराची आणि भारतमातेची सेवा उत्तमरीत्या घडावी, त्यांनी आपल्या कार्यकुशलतेने आणि निष्ठेने उत्तुंग कामगिरी करावी, अशा शुभेच्छा या प्रसंगी व्यक्त करण्यात आल्या.
या कार्यक्रमास अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री विलासराव पाटील, राष्ट्रीय सचिव श्री काशिनाथ माळी, धुळे शहराध्यक्ष श्री हरीशचंद्र रेंडे, माळी कर्मचारी सेवा संघाचे श्री किशोर माळी गुरुजी, श्री संदीप माळी सर, तसेच महासंघाचे धुळे महानगर पदाधिकारी श्री मुरलीधर बाविस्कर आणि श्री सुनील माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
या सन्मानामुळे उपस्थित वातावरणात आनंद व अभिमानाची भावना दाटून आली होती.

