अमळनेरात अन्यायकारक प्रभाग रचना रद्द करा! –आमदार शिरीष दादा चौधरी मित्र परिवार आघाडीची ठाम भूमिका
1 min read

अमळनेरात अन्यायकारक प्रभाग रचना रद्द करा! –आमदार शिरीष दादा चौधरी मित्र परिवार आघाडीची ठाम भूमिका

Loading

अमळनेरात अन्यायकारक प्रभाग रचना रद्द करा! –आमदार शिरीष दादा चौधरी मित्र परिवार आघाडीची ठाम भूमिका

अमळनेर प्रतिनिधी– लोकशाहीच्या नावाखाली होत असलेला अन्याय आम्ही सहन करणार नाही…!
नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अमळनेर नगरपरिषदेकडून करण्यात आलेली प्रभाग रचना ही पूर्णतः नियमबाह्य, मनमानी व हेतुपुरस्सर असल्याचा गंभीर आरोप आमदार श्री. शिरीष दादा चौधरी मित्र परिवार आघाडीने केला आहे. याविरोधात नगरपरिषदेला निवेदन देऊन सदर प्रभाग रचना तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

📍 निवेदनातील मुद्दे स्पष्टपणे अन्याय दाखवणारे –
➡️ प्रभाग रचना करतांना महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांचे सरळसरळ उल्लंघन.
➡️ भौगोलिक सीमांकडे दुर्लक्ष करून नद्या-नाले ओलांडून प्रभाग आखणी.
➡️ रेल्वे रुळ ओलांडून सिमांकन करून नागरिकांना अडचणीत आणणे.
➡️ वस्त्यांचे अन्यायकारक विभाजन.
➡️ प्रगणक गट हेतुपुरस्सर फोडणे.

यातून हे स्पष्ट होते की, प्रभाग रचना राजकीय स्वार्थासाठी करण्यात आली असून ही लोकशाहीची गळचेपी आहे.
या निषेध निवेदनावर गटनेते प्रविण पाठक, रणजीत भिमसिंग पाटील, चंद्रकांत कंखरे सर, भरत पवार, नसिरोद्दीन हाजी शरफोद्दीन, जाकीर मेवाती, गुलाबनबी पठाण, भूषण पाटील, सागर विसपुते, राहुल कंजर, विपुल पाटील, सनी चव्हाण, शुभम यादव, मनोज शिंगाने, पंकज चौधरी, अनिल महाजन, नरेश कांबळे, नईम पठाण आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आघाडीचा इशारा –
“जर प्रभाग रचना रद्द करून नव्याने, नियमांनुसार रचना करण्यात आली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही,” असा ठाम इशारा निवेदन देताना पदाधिकाऱ्यांनी दिला.
त्यामुळे आगामी दिवसांत अमळनेर नगरपरिषदेसमोर मोठा राजकीय संघर्ष उभा राहण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *