शिंदखेडा तालुक्यात सावता परिषदेची धुरा विशाल माळींकडे
![]()
शिंदखेडा तालुक्यात सावता परिषदेची धुरा विशाल माळींकडे
शिंदखेडा (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष युवराज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सावता परिषद शिंदखेडा तालुका अध्यक्षपदी कृपाळे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, तसेच वारकरी साहित्य परिषदेचे विभागीय अध्यक्ष विशाल माळी यांची निवड करण्यात आली.
या नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बी.एन. बिरारी, जिल्हा अध्यक्ष युवराज माळी, उपाध्यक्ष परमेश्वर माळी, ईश्वर माळी, नाना माळी, धनराज माळी, योगेश जाधव, नितीन माळी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या निवडीबद्दल परिसरात समाधानाचे व उत्साहाचे वातावरण असून, विशाल माळी यांच्या नेतृत्वामुळे सावता परिषदेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

