पवित्र श्रावण मासात उदयापासून पाच दिवसीय पारायण सोहळ्याची मंगल सुरुवात
1 min read

पवित्र श्रावण मासात उदयापासून पाच दिवसीय पारायण सोहळ्याची मंगल सुरुवात

Loading

पवित्र श्रावण मासात उदयापासून पाच दिवसीय पारायण सोहळ्याची मंगल सुरुवात

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) –
अमळनेर स्टेशन रोडवरील स्वामीनारायण मंदिरात विश्ववंदनीय प.पू. महंत स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने पवित्र श्रावण मास निमित्त उदयापासून पाच दिवसीय पारायण सोहळ्यास प्रारंभ होणार आहे.
दिनांक 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान दररोज रात्री 8 ते 10 या वेळेत पूज्य योगी स्नेह व पूज्य अखंड मुनी स्वामी यांचे अमृतमय कीर्तन, प्रवचन आणि भक्तिपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आध्यात्मिक ऊर्जा, भक्तीभाव आणि श्रावणातील मंगल वातावरणाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामीनारायण मंदिर व्यवस्थापनाने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *