अंगारकी चतुर्थी निमित्त अमळनेरच्या मंगळ ग्रह मंदिरात भक्तांचा महासागर”
![]()
“अंगारकी चतुर्थी निमित्त अमळनेरच्या मंगळ ग्रह मंदिरात भक्तांचा महासागर”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)– आज श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी आणि त्यातही मंगळवारच्या दिवशी आलेली अंगारकी चतुर्थी या दुर्मिळ योगामुळे अमळनेरच्या श्री मंगळ ग्रह मंदिरात सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी उसळली.
अंगारकी चतुर्थी वर्षातून केवळ दोनदा येते, त्यामुळे या दिवशी व्रत, उपास व पूजा करणाऱ्यांना विशेष पुण्य लाभते, अशी श्रद्धा आहे. या पावन दिवशी सकाळी पहाटेपासून मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविक रांगा लागल्या होत्या. भगवान गणेश व श्री मंगळ ग्रहाच्या पूजन-अर्चनाने परिसर भक्तिमय झाला.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखंड गजर, मंत्रोच्चार आणि घंटानादात भाविकांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. मंदिर परिसरात धार्मिक वातावरण आणि उत्साहाचा माहोल पाहायला मिळाला.
मंगळ ग्रह संस्थांनचे अध्यक्ष डॉ डिगंबर महाले व विश्वस्त मंडळ व सर्व सेवेकरी याकामी दर्शन घेणाऱ्यांसाठी सहकार्य करीत असतात..

