२६ व्या वर्षी अनुराग पाटीलचा दुहेरी विजय – पदोन्नतीसह IIT पवईत ऐतिहासिक यश
1 min read

२६ व्या वर्षी अनुराग पाटीलचा दुहेरी विजय – पदोन्नतीसह IIT पवईत ऐतिहासिक यश

Loading

२६ व्या वर्षी अनुराग पाटीलचा दुहेरी विजय – पदोन्नतीसह IIT पवईत ऐतिहासिक यश

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
स्वप्नं मोठी असावीत आणि त्यांना गाठण्याची जिद्दही तितकीच मोठी असावी, याचं जिवंत उदाहरण ठरला आहे ची. अनुराग सुनील पाटील. अवघ्या २६ व्या वर्षी त्याने दोन मोठी शिखरं पादाक्रांत केली आहेत.
JSW Steel Ltd., Dolvi (Pen) येथे असिस्टंट मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या अनुरागची अलीकडेच डेप्युटी मॅनेजर (प्रोजेक्ट) पदावर पदोन्नती झाली. कंपनीतील उत्कृष्ट कार्यक्षमता, नेतृत्वगुण आणि प्रामाणिक मेहनतीची ही थेट पावती आहे.
याचबरोबर, JSW स्टीलच्या सौजन्याने व IIT पवई पंचसमितीच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कठोर निवड प्रक्रियेत – शैक्षणिक गुणवत्ता, मुलाखत आणि नोकरीतील कार्यप्रदर्शन या सर्व निकषांवर यशस्वी ठरत अनुरागची IIT पवई येथील M.Tech मोफत शिक्षणासाठी निवड झाली.
अनुराग हा श्री गणेश लॅब चे संचालक व जायंट्स ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील पंडितराव पाटील यांचा सुपुत्र असून, त्याच्या या दुहेरी यशामुळे कुटुंब, मित्रपरिवार आणि गुरुवर्यांमध्ये अभिमानाचा भाव दाटला आहे.
अनुरागचं हे यश तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून, मेहनत आणि चिकाटीने स्वप्नं साकार होतात याचा तो उज्ज्वल नमुना आहे.

 

One thought on “२६ व्या वर्षी अनुराग पाटीलचा दुहेरी विजय – पदोन्नतीसह IIT पवईत ऐतिहासिक यश

  1. खुप खूप अभिनंदन अजून अशीच moth मोठी शिखर पादाक्रांत करत राहा ह्याच शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *