“सेंट अलॉयसेस हायस्कूलमध्ये रक्षाबंधनाचा उत्साह, प्रेम व एकतेचा संदेश”
1 min read

“सेंट अलॉयसेस हायस्कूलमध्ये रक्षाबंधनाचा उत्साह, प्रेम व एकतेचा संदेश”

Loading

“सेंट अलॉयसेस हायस्कूलमध्ये रक्षाबंधनाचा उत्साह, प्रेम व एकतेचा संदेश”

आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी सेंट अलॉयसेस हायस्कूल मध्ये रक्षाबंधन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थिनींनी आपल्या भावांना राखी बांधली. तर शाळेतील सर्व आदरणीय सिस्टर्स यांनी शाळेतील पुरुष शिक्षकांना राखी बांधून प्रेम ,कर्तव्य, संरक्षण अशा गुणांचे मूल्य विद्यार्थ्यांसमोर मांडले. या रक्षाबंधनाच्या पवित्र अशा सणाच्या माध्यमातून एकात्मतेचे सादरीकरण देखील शाळेच्या माध्यमातून करण्यात आले. शालेय प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी अशा प्रकारचे सर्व जाती,पंथाचे सणवार मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.व विद्यार्थ्यांना सामाजिक एकतेचा संदेश देखील दिला जातो. कार्यक्रमाच्या यशाकरिता श्री बर्नार्ड सर श्री तुषार चिंधडे सर सौ छाया भंगाळे व सर्व शिक्षक वृंदांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *