वेशभूषा, संवाद आणि प्रेरणा – २ मिनिट शो स्पर्धेतून अहिल्यादेवींचा गौरव , अमळनेर महीला मंचाचा उपक्रम
![]()
वेशभूषा, संवाद आणि प्रेरणा – २ मिनिट शो स्पर्धेतून अहिल्यादेवींचा गौरव
अमळनेर महीला मंचाचा उपक्रम
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे शहरातील विवाहित भगिनींसाठी आगळीवेगळी “२ मिनिट शो” स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे संपूर्ण देशभर साजऱ्या होत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षा निमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणे आणि महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त 13 ऑगस्ट रोजी ही स्पर्धा जिजाऊ जिम (स्टेट बँकेच्या वरच्या मजल्यावर) दुपारी 4 वाजता होणार आहे.
स्पर्धेचे स्वरूपही आगळेवेगळे – स्पर्धकांनी अहिल्यादेवींची वेशभूषा परिधान करून, जणू त्या स्वतः बोलत आहेत, अशा पद्धतीने २ मिनिटांचे सादरीकरण करायचे आहे. प्रवेश विनामूल्य असून, प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच सहभागी संख्या २५ पेक्षा अधिक असल्यास दोन उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत. परिक्षक बाहेरील असतील आणि त्यांचा निर्णय अंतिम मानला जाईल.
नोंदणीसाठी शेवटचा दिवस ११ ऑगस्ट २०२५ असून, इच्छुकांनी प्रकल्प प्रमुख वसुंधरा लांडगे (९६८९०३७८४१) किंवा प्रा. शीला पाटील (९४२२४०९९५९) यांच्याशी संपर्क साधावा.असे अध्यक्ष डॉ. अपर्णा मुठे, उपाध्यक्ष तिलोत्तमाताई पाटील, सेक्रेटरी सरोजताई भांडारकर, कोषाध्यक्ष कांचनताई शहा व कार्यकारिणी सदस्यांनी शहरातील सर्व भगिनींना आवाहन केले आहे की, “त्वरा करा, आम्ही तुमच्या सादरीकरणाची आतुरतेने वाट पाहतोय!”
.

