ब्राम्हणवेल विद्यालयात विद्यार्थ्यांचा देशभक्ती, सांस्कृतिक वारसा व बंधुभावाचा जल्लोष
![]()
ब्राम्हणवेल विद्यालयात विद्यार्थ्यांचा देशभक्ती, सांस्कृतिक वारसा व बंधुभावाचा जल्लोष
अमळनेर प्रतिनिधी
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे दि. ०९ ऑगस्ट क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिवस व रक्षाबंधन कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या भव्य दिव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. माळी बी. एन. यांनी धुरा सांभाळली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित संस्थेचे सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ महाजन, शिक्षक श्री. माळी के. एन. श्री. हिरामण सोनवणे, श्री. निकुंभ बी. एस. श्री. रविंद्र सुर्यवंशी, श्री. प्रमोद महाजन, लिपिक श्री. चेतन महाजन, शिपाई श्री. पंडित खैरनार, श्री. सुनिल ठाकरे उपस्थित होते. क्रांती दिनाच्या अनुषंगाने स्वातंत्र्य लढ्यातील शूर वीरांच्या बलीदानाच्या इतिहासाला उजाळा देताना विद्यार्थी शिक्षकांनी आप आपली भाषणे, देशभक्तीपर गीत गायन, नृत्य सादरीकरण व मनोगते मांडली. तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थी व विद्यार्थीनींनी पारंपारिक आदिवासी पेहराव करून विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करताना आदिवासी ऑडिओ गीतांवर आधारित अतिशय उत्कृष्ट नृत्य सादरीकरण, गायन सादरीकरण व विविध भाषणे दिली. याच दिवशी रक्षाबंधन कार्यक्रम असल्यामुळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये पवित्र बंधू भगिनी भाव जागृत करण्यासाठी सामुदायिक रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी रक्षाबंधनाचे महत्व व सांस्कृतिक सामाजिक नीतिमूल्ये, परंपरा जोपासली जावी म्हणून विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कृती युक्त कार्यक्रमात सहभागी होऊन सर्व विद्यार्थ्यांना व मुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे औक्षण करून विद्यार्थ्यांनींनी राख्या बांधल्या. त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थींनींचे पाया पडून आदरयुक्त पवित्र भाव समर्पण केले. अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनी, व शिक्षकांनी आपले मनोगत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक श्री. हिरामण सोनवणे यांनी केले. तर याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटपा सोबतच क्रीडा शिक्षक श्री. निकुंभ बी. एस. यांनी आभार प्रदर्शन केले.

