जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प जळगाव जिल्ह्यात रक्षाबंधन कार्यक्रम महिला व बालक संरक्षण करण्यासाठी आवाहन
![]()
जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प जळगाव जिल्ह्यात रक्षाबंधन कार्यक्रम
महिला व बालक संरक्षण करण्यासाठी आवाहन
अमळनेर प्रतिनिधी
आधार बहुउद्देशीय संस्था, जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्प टीम मेंबर यांनी जळगाव जिल्ह्यात
अमळनेर पोलिस स्टेशन,अमळनेर भुसावळ , जळगाव रेल्वे स्टेशन येथे रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला.
अमळनेर पोलिस स्टेशन येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते, निरीक्षक
दत्तात्रय निकम , प्रांत अधिकारी मुंडावरे तहसीलदार, रूपेशकुमार सुराणा ,नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस कर्मचारी ,इन्स्पेक्टर सत्यजित कुमार , आर पी एफ कर्मचारी यांना राखी बांधण्यात आली.
पोस्टर बॅनर लावून बाल विवाह मुक्त भारत व ट्रॅफिकिंग विषयी संदेश देण्यात आला.
आधार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भारती पाटील, संचालक रेणु प्रसाद, प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर, सुनील हिवाळे, दिपाली हिवाळे, ज्ञानेश्वरी पाटील,ऊर्जिता शिसोदे यांनी सहभाग नोंदविला

