मायेच्या धाग्यांनी जोडलेली हृदये – अमळनेरच्या चिमुकल्यांकडून विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनोखी राखी भेट”
![]()
“मायेच्या धाग्यांनी जोडलेली हृदये – अमळनेरच्या चिमुकल्यांकडून विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनोखी राखी भेट”
अमळनेर प्रतिनिधी– लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित नवीन मराठी शाळा, अमळनेर येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला. शालेय उपक्रमांतर्गत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी सुंदर राख्या बनवल्या. या राख्या धुळे येथील चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर संचलित परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा, वंजारी खुर्द, पारोळा येथील विशेष दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पाठविण्यात आल्या.
रक्षाबंधनाच्या दिवशी या राख्या विशेष विद्यार्थ्यांनी एकमेकांना व त्यांची काळजी घेणाऱ्या शिक्षकवृंदांना बांधून आनंद व्यक्त केला. मायेच्या या धाग्यातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रेम, आपुलकी व सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश दिला.
या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व बालमित्रांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. योगेश महाजन यांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत, विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलतेचे व कौशल्याचे कौतुक केले.

