कै. एन.जी. पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डांगरी शाळेत मोफत वह्या वाटप”
1 min read

कै. एन.जी. पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डांगरी शाळेत मोफत वह्या वाटप”

Loading

“कै. एन.जी. पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डांगरी शाळेत मोफत वह्या वाटप”

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड संचलित न्यू इंग्लिश स्कूल, प्रगणे डांगरी येथे कै. एन.जी. पाटील (दादा) यांच्या स्मरणार्थ मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवडचे चेअरमन माननीय आबासो जयवंतरावजी मन्सारामजी पाटील यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष आबासो देविदास शामराव पाटील, आबासो बापूसो श्री महारु रामदास शिसोदे, आबासो श्री चंद्रकांत रामराव शिसोदे, आबासो अनिल शिवदास शिसोदे आणि डांगरी गावच्या सरपंच ताईसो दिपाली उदय शिसोदे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. उपाध्यक्ष आबासो देविदास पाटील यांनी मनोगतात एन.जी. दादा व सी.जी. दादा यांच्या कार्याची माहिती दिली. आबासो अनिल शिसोदे यांनी एन.जी. दादांचा खडतर प्रवास उलगडत शिक्षकांचा गौरव केला. सरपंच ताईसो दिपाली शिसोदे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात चेअरमन आबासो जयवंतराव पाटील यांनी विद्यार्थी व शिक्षकांच्या पाठीशी सदैव उभे असल्याची ग्वाही दिली व शाळेविषयी तळमळ व्यक्त केली. त्यांनी एन.जी. दादांना मिळालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार याची माहितीही दिली.
शेवटी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निलेश शर्मा यांनी केले. प्रस्तावना महेंद्र पाटील यांनी केली तर आभार प्रदर्शन सुरेश वाडीले यांनी मान्यवरांचे मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री. राकेश पवार, ज्येष्ठ शिक्षक पी. व्ही. साळुंखे, जे. एन. करंदीकर, सौ. प्रतिभा सोनवणे, भाऊसाहेब प्रजय साळुंखे व अण्णासो राजेंद्र शिंदे यांचे परिश्रम महत्त्वाचे ठरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *