करवाढ, शास्ती व लोकवर्गणी रद्द करा –मा. आमदार शिरीषदादा मित्र परिवाराचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन , १५ ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास १७ पासून तीव्र आंदोलनाचा इशारा
![]()
करवाढ, शास्ती व लोकवर्गणी रद्द करा – मा.आमदार शिरीषदादा मित्र परिवाराचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
१५ ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास १७ पासून तीव्र आंदोलनाचा इशारा
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
:-आमदार श्री शिरीष दादा चौधरी मित्र परिवार आघाडी चा वतीने अमळनेरनगरपरिषद चे मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर यांना आज करवाढ, शास्ती (२%व्याज), मालमत्ता हस्ता तरण शुल्क, लोकवकर्गणी आदी विषयांचे अंतिम निवेदन दिले आहे. अमळनेरकरांवर लादलेली करवाढ, लोकवर्गणी, शास्ती रद्द करणे बाबत सुमारे दोन (२) वर्षा पासुन आपणाकडे सनदशीर मार्गाने पाठपुरावा करीत आहोत. प्रत्येक वेळेस आपण फक्त आशवासन देत वेळ काढुपणा करीत आहेत. अमळनेरकरांवर लादलेली करवाढ आपण संक्तीने वसुल करीत आहात. मागील काळात देखील पत्रकार बांधवांच्या माध्यमातुन याबाबत आवाज उठवीला होता तरी देखील कुंभकरणाची झोप घेत प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
महाराष्ट्र शासनाने यास अनुसरून शास्ती माफी, मालमत्ता हस्तांतरण फी बाबत निर्णय घेतला आहे. तरी देखील आपण वसुली करीत आहात.
तरी आपणास पुनश्च अंतीम विनंती की, आपण दिनांक १५ ऑगष्ट पर्यंत अमळनेर करांच्या हितार्थ निर्णय घ्यावा अन्यथा दिनांक १७ ऑगष्ट पासुन आम्ही तिव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबवु याची आपण नोद घ्यावी. निवेदनावर रणजितनाना पाटील,नरेश कांबळे, बाळासाहेब संदानशिव,सैय्यद कादिर,मनोज शिंगाणे राहुल कंजर,पंकज भोई, प्रकाश माळी,पंकज चौधरी नविद शेख, दिपक चौगुले,पंकज मोरे भरत पवार,विपुल पाटील,शुभम यादव नईम पठाण,कुंदन पाटील, पारस धाप, सागर साळी, राम खेडकर आदि कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरिंचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले. तसेच मुख्याधिकारी यांना शासननिर्णय प्रत देत सविस्तर चर्चा कार्यकर्त्यांनी केली.

