पुस्तक वाचन: मेंदूला देणारी सुपरफास्ट ताकद  -सतीश पाटील सदस्य महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती मुंबई
1 min read

पुस्तक वाचन: मेंदूला देणारी सुपरफास्ट ताकद -सतीश पाटील सदस्य महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती मुंबई

Loading

पुस्तक वाचन: मेंदूला देणारी सुपरफास्ट ताकद

-सतीश पाटील
सदस्य महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती मुंबई

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
इंटरनेटच्या युगात आजही जगात ज्या व्यक्ती आपल्या आयुष्यात यशस्वी झाले त्यापैकी 93% यशस्वी व्यक्ती ह्या पुस्तक वाचनामुळे यशस्वी झालेले आहेत एक वेळ बी गोल्ड एका कंपनीत मुलाखत देण्यासाठी गेले असता त्यांना एक प्रश्न विचारला गेला की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे ते तेव्हा म्हणाले सुपरफास्ट (जलद गती) आपल्याजवळ म्हणजे सुपरफास्ट वाचण्याची शक्ती असली पाहिजे बी गोल्ड एवढे श्रीमंत असूनही ते आजही खूप मोठ्या प्रमाणात पुस्तक वाचन करत असतात तरी त्यांना अजूनही नवनवीन पुस्तक वाचण्याची व त्या पुस्तक वाचनात दंग राहण्याची त्यांची इच्छा असते म्हणून जसं आपल्या शरीरातून मसल किंवा शरीर चांगले राहावे यासाठी व्यायामाची गरज असते तसंच आपल्या मेंदूचा व्यायाम करण्यासाठी किंवा मेंदूच्या मसल करण्यासाठी पुस्तक वाचन करणे तो सुद्धा एक मेंदूची मसल करणे किंवा व्यायाम करणे महत्त्वाचे आहे पुस्तक वाचण्याने आपल्या मेंदूची विचार करण्याची क्षमता वाढते आपला मेंदू नेहमी कॉपी करत असतो आपला मेंदू विचार करण्याची क्षमता वाढते आपला मेंदू नेहमी कॉपी करत असतो आपण मेंदूला जे द्याल ते तो घेतो म्हणून पुस्तक वाचन फार महत्त्वाचे आहे पुस्तक वाचन करून आपण स्वतः मध्ये बदल करू शकता पुस्तक आपल्याला विशेष ओळख नाव मिळवून देतात म्हणून आपण वाचण्यास प्रथम क्रमांक दिला पाहिजे बरीच लोक म्हणतील आम्हाला वेळ मिळत नाही म्हणून अशा लोकांनी रात्रीच्या वेळेस आपला मेंदू शांत असतो म्हणून कमीत कमी 20 मिनिटं वाचन केले पाहिजे असे केल्याने आपण दहा ते बारा दिवसात एक पुस्तक वाचन करू शकतो वाचनाने आपले व्याकरण सुधारते व समजूतदारपणा पण येतो नवीन शब्दरचना लक्षात येते वाचन केल्याने मनावरचा ताण कमी होतो आपली स्मरणशक्ती वाढते नवीन ज्ञान मिळते आपण अडचणीत असताना पुस्तकच आपले मित्र असतात आपला शब्द कोशमध्ये वाढ होते बोलण्याची क्षमता वाढते संवाद कौशल्य वाढते आपला प्रभाव वाटतो आपले नोकरी व व्यवसायामध्ये सुद्धा वाचनाने फायदे होतात वाचनाने आपली करमणूक होते मनोरंजन होते एखाद्या विषयाचे ज्ञान प्राप्त होते व वैज्ञानिक आणि अध्यात्मिक रहस्य आपल्याला मिळत असते म्हणून आपण आजच वाचण्यात सुरुवात करावी म्हणून *(वाचाल तर वाचाल)*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *