राखीच्या नात्याला साडीची सोनरी किनार — एपीआय तुषार देवरे यांचा अभिनव सन्मान सोहळा
![]()
“राखीच्या नात्याला साडीची सोनरी किनार — एपीआय तुषार देवरे यांचा अभिनव सन्मान सोहळा”
धनुर- प्रतिनिधी-* धुळे तालुक्यातील सोनगीर पोलीस स्टेशन येथे सोनगीर पोलीस स्टेशनचे अंतर्गत येणाऱ्या सर्व महिला पोलीस पाटील व महिला पोलीस कर्मचारी यांच्या हातून राखी बांधत एपीआय देवरे व सर्व पोलीस स्टेशन स्टाफने यांनी राखी बांधत रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला यानिमित्ताने महिला पोलिस पाटील,व कर्मचारी यांना साडी चोळी भेट देऊन सन्मानित करण्यात आले. सपोनि. तुषार देवरे यांच्या अभिनव उपक्रमाबद्दल धुळे जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अतुल भामरे , उपाध्यक्ष विजयराव देशमुख, तालुका अध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, नितीन महाले संदेश पाटील यांनी स्तुत्य असे अभिनंदन केले .
धुळे तालुक्यातील सोनगीर पोलीस स्टेशन येथे सोनगीर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तुषारजी देवरे साहेब यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधन निमित्त सोनगिर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील महिला पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी यांना एकत्रित बोलवत एपीआय देवरे यांच्या सह सर्व सहकारी यांना राखी बांधत रक्षाबंधन साजरा करण्यात आला या निमित्ताने भेट म्हणून एपीआय तुषार देवरे साहेब यांनी साडी भेट दिली यावेळी महिला पोलीस कॉन्स्टेबल रजनी पाटील ,वैशाली गांगुर्डे, दुर्गा गायकवाड महिला पोलीस पाटील विद्या पाटील दापुरा,रेखा वाघ चिंचवार, माधुरी ठाकरे विश्वनाथ ,मंगलबाई अहीरराव मोहाडी ,रोशनी पाटील कापडणे, माया थोरात हेंकळवाडी ,सीमा मासुळे नवलाणे ,सुवर्णा मासुळे नकुंभे, उर्मिला गवते धमाणे,आदी उपस्थित होते.

