विश्व आदिवासी दिवस व व्यावसायिक समाजकार्य पंधरवाडा निमीत्त आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादन समाजकार्य महाविद्यालय अमळनेर चा मासवे महाराष्ट्र आणि नॅप्सी दिल्ली यांचा उपक्रमात सहभाग
![]()
विश्व आदिवासी दिवस व व्यावसायिक समाजकार्य
पंधरवाडा निमीत्त आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादन
समाजकार्य महाविद्यालय अमळनेर चा
मासवे महाराष्ट्र आणि नॅप्सी दिल्ली यांचा उपक्रमात सहभाग
अमळनेर प्रतिनिधी
09 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन व विश्व आदिवासी दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
या निमित्ताने मास्वे (महाराष्ट्र सोशलवर्क एज्युकेटर्स असोसिएशन) आणि नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्कर्स इन इंडिया दिल्ली द्वारा 9 ते 23 ऑगस्ट 2025 या कालावधीत समाजकार्य पंधरवाडा संपूर्ण महाराष्ट्रात व देशभरात राबविण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून या समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे सदर पंधरवड्याची सुरुवात 9 ऑगस्ट क्रांती दिन निमित्त क्रांतीकारकांना व आदिवासी महामानवांना अभिवादन करून करण्यात आले.
तसेच महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये रंगनाथन यांना अभिवादन करून ग्रंथालय दिन साजरा करण्यात आला. अशा विविध उपक्रमांनी समाजकार्य पंधरवडाची सुरुवात महाविद्यालयामध्ये करण्यात आली. यावेळी उपस्थित संशोधन केंद्रातील संशोधक विद्यार्थ्यांनी आदिवासी क्रांतिकारकांचे जीवन चरित्र, व्यावसायिक समाजकार्याची सद्य परिस्थितीत गरज अशा विविध विषयावर आपली मत मांडली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रंथपाल प्रा. उदय महाजन होते तर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.पी एस पाटील, संशोधन केंद्र संचालक डॉ. भरत खंडागळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. विजयकुमार वाघमारे, डॉ. अनिता खेडकर, डॉ. श्वेता वैद्य, प्रा. धनराज ढगे, डॉ. सागरराज चव्हाण, डॉ. अस्मिता सरवैया, डॉ. सोनवणे, सेवानिवृत्त प्राध्यापक संजिव पगारे, संशोधक विद्यार्थी निखिल चौधरी, अस्मिता पगारे, किशोर माळी व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

