प्रामाणिक सेवेला सन्मानाचा मुजरा — पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील महाजन यांचा स्वेच्छा सेवानिवृत्ती सत्कार”
![]()
“प्रामाणिक सेवेला सन्मानाचा मुजरा — पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील महाजन यांचा स्वेच्छा सेवानिवृत्ती सत्कार”
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. सुनील दयाराम महाजन यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्ती निमित्ताने भावपूर्ण सत्कार समारंभ पार पडला. बुके शाल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक प्रकाश पाटील, पत्रकार ईश्वर महाजन, अनिल महाजन (चाळीसगाव), मधुकर मगरे (चोपडा), भगवान महाजन (मुंबई), किशोर शेलकर (अमळनेर) यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सुनील महाजन यांनी 21 वर्षे मुंबई, चोपडा ग्रामीण, जळगाव मुख्यालय, धरणगाव व अमळनेर येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून प्रामाणिक व निष्ठेने सेवा बजावली. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि उत्कृष्ट कार्याचे सर्वांनी कौतुक करत गौरवोद्गार काढले.

