व्ही. झेड. पाटील हायस्कूल शिरुड येथे झाडांचा वाढदिवस साजरा*
1 min read

व्ही. झेड. पाटील हायस्कूल शिरुड येथे झाडांचा वाढदिवस साजरा*

Loading

*व्ही. झेड. पाटील हायस्कूल शिरुड येथे झाडांचा वाढदिवस साजरा*

शिरुड ता. अमळनेर येथील व्हि.झेड.पाटील हायस्कूल येथे “झाड आपल्या कुटुंबाचा भाग आहेत” या संदेशाला मूर्त स्वरूप देत स्थानिक पर्यावरण प्रेमी डी.ए.धनगर सर यांच्या संकल्पनेतून शालेय समिती अध्यक्षा श्रीमती.पुष्पलता अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाडांचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती सदस्य काळू नाना पाटील ,वसंत भगवान पाटील , विजयानंद बोरसे, पूंजू एकोबा पाटील,दिलीप पाटील सर, डी. ए. धनगर,योजना पाटील मॅडम ,मुख्याध्यापक अनिल सूर्यवंशी, अतुल सोनवणे, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. झाडांना फुगे, बलून ,राखी बांधून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रचंड उत्साहात पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या व्यक्तीनुसार विद्यार्थ्यांनी झाडाचे संगोपन केलेले आहे. त्यामुळे त्यांना प्रथम वाढदिवस साजरा करताना मोठा आनंद झाला. समाजाला प्रेरणादायी संदेश दिला गेला.
वृक्षांचे जतन आणि संवर्धन करणे महत्त्वाचे ठरले आहे. सध्याच्या काळातील पावसाची अनियमित निसर्गाचा लहरीपणा हे सर्व टाळायचं असेल तर आपल्याला निकोप निसर्ग वाढवणे त्यासाठी वृक्ष लागवड करून संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याची जाणीव शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्हावी यासाठी सदरचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गा विषयी संवेदनशीलता जागृत करून निसर्गातील झाडे किती महत्त्वाची जबाबदारी घेतात हे पटवून देण्यात आले. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांमध्ये जान आणि भान आले. आपल्याला जर मोकळा श्वास घ्यायचा असेल तर उद्याच्या काळात झाडे जगवणे व त्यांना वाढवणे किती आवश्यक आहे याची जबाबदारी त्यांना कळली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक पी.जी. निकम , मंगलसिंग जाधव, श्रीमती.योगिता देशमुख , गुलाब बोरसे, भूषण सोनवणे व शिक्षकेतर कर्मचारी अरुण पाटील व राहुल लांडगे झाडे जगवणारी विद्यार्थी यांनी मेहनत घेतली. यावेळी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. सदर कार्यक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *