कर्तृत्वाला मानाचा मुजरा! पोलिस पाटील गणेश भामरे यांचा महसूल सप्ताहात गौरव”
1 min read

कर्तृत्वाला मानाचा मुजरा! पोलिस पाटील गणेश भामरे यांचा महसूल सप्ताहात गौरव”

Loading

कर्तृत्वाला मानाचा मुजरा! पोलिस पाटील गणेश भामरे यांचा महसूल सप्ताहात गौरव”

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
महसूल सप्ताह अंतर्गत उत्कृष्ट पोलिस पाटील म्हणून काम करणाऱ्या ब्राह्मणे ता.अमळनेर येथील गणेश भामरे पाटील यांचा प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या हस्ते ५ रोजी चोपडा येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी अमळनेर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार प्रशांत धमके, अजय कुलकर्णी, डी.आर.सौंदाणे, आर.आर ढोले यांच्या सह अमळनेर प्रांत कार्यालय अंतर्गत सर्व अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, क्लार्क, ग्राम महसूल सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश भामरे यांनी बाम्हणे परिसरातील वाळू चोरी रोखण्यासाठी विविध उपाययोजना करत कर्तव्य पार पाडले असून बाम्हणे फाट्यावर लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी धुळे – जळगाव जिल्ह्याच्या तपासणी नाक्यावर ग्रामस्थांच्या मदतीने महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.गावात निर्माण झालेल्या तणावाच्या विविध प्रसंगी सामंजस्याची भूमिका घेत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली यामुळे बाम्हणे गावाने तंटामुक्त गाव म्हणून जिल्हास्तरीय २ रा क्रमांक पटकाविला.निवडणूक काळात गावात आदर्श मतदान केंद्र तयार केले.
गावातील ग्रामस्थांची सुरक्षितता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले.गणेश भामरे यांनी सामाजिक कामासोबतच सहकाराला बळकट करण्यासाठी गावातील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची धुरा देखील यशस्वीपणे सांभाळली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील, खासदार स्मिताताई वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील तसेच सामाजिक व राजकीय स्तरातून अभिनंदन होत आहे.

 


 

💐 हार्दिक अभिनंदन! 💐
पोलिस पाटील  मा.श्री. गणेशजी भामरे (बाम्हणे, ता. अमळनेर)
यांना महसूल सप्ताह अंतर्गत “उत्कृष्ट पोलिस पाटील” म्हणून प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे,तहसीलदार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, याचा आम्हाला मनस्वी आनंद व अभिमान वाटतो.

गावाच्या कायदा सुव्यवस्थेसाठी असलेली त्यांची बांधिलकी, वाळू चोरी रोखण्यासाठी घेतलेले पुढाकार, निवडणूक काळातील सतर्कता, सीसीटीव्ही यंत्रणा आणि तंटामुक्त गावाच्या दिशेने घेतलेली भूमिका — ही सर्वच गोष्टी इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

मराठी लाईव्ह न्युज परिवारातर्फे त्यांच्या यशस्वी कार्याला मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 🌟

💐💐💐💐💐

मुख्य संपादक – ईश्वर आर. महाजन
कार्यकारी संपादीका – सौ. ज्योती ईश्वर महाजन
📲 www.marathilivenews.net/news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *