वडिलांच्या स्मृतीला शिक्षणरूपी श्रद्धांजली! , “कलाशिक्षक संजय मंगळे यांचा अनोखा उपक्रम — दशक्रिया विधींचा खर्च टाळून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना महागडी पुस्तके भेट”
![]()
वडिलांच्या स्मृतीला शिक्षणरूपी श्रद्धांजली!
“कलाशिक्षक संजय मंगळे यांचा अनोखा उपक्रम — दशक्रिया विधींचा खर्च टाळून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना महागडी पुस्तके भेट”
शिंदखेडा प्रतिनिधी
शिंदखेडा तालुक्यातील भडणे
येथील रमेश किशन मंगळे एसटी ड्रायव्हर यांच अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले शिक्षक हा नेहमी विद्यार्थ्यांचे कल्याण व शैक्षणिक विकास कसा व्हावा असा नेहमी आदर्श ठेवत असतो भडणे येथील कला शिक्षक संजय मगळे पेंटर त्यांनी आपल्या वडिलांचे दशक्रिया व गंधमुक्तीचा अनाठायी खर्च न करता तो खर्च शिक्षण हेच वाघीणीच दुध आहे जो शीकेल तोच टिकेल भडणे गावातील मुलांनी जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेत सहभाग घेऊन गावाची नाव उज्ज्वल करावे तसेच त्यांना लागणारी स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महागडी पुस्तकाचा संच आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ भडणे उपलब्ध करून गावातील हिलाल सोमा मगळे सार्वजनिक वाचनालय अभ्यासिका येथे उपलब्ध करून दीले जि प सदस्य धनंजय मगळे यांच्याकडे सदर पुस्तक देण्यात आली आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून आपण गावाचं देणं लागत याच गावात आपली शालेय शिक्षण पूर्ण झाले शिकून आज कलाशिक्षक पत्नी शिक्षिका या पदावर पोहोचले याच गावात माझे आजोबा शिक्षक होते आजोबांच्या आठवणी व त्यांची दिलेली शिकवण शिक्षकांची विद्यार्थ्यांविषयी असलेली आपुलकी या उद्देशाने गावातील गरजु विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कामासाठी लागणारे साहित्य भेटवस्तू देण्याच्या संकल्प संजय मंगळे यानी. व्यक्त केला
चौकट
भडणे गावातील गरजू तसेच स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महागडी पुस्तके उपलब्ध करून दिल्याबद्दल आर्थिक विवंचनेत असलेल्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला यामुळे मनाला समाधान वाटले
संजय मंगळे पेटर
कलाशिक्षक भडणे,
या अभिनव उपक्रमाबद्दल परिसरात कौतुक करण्यात येत आहे यावेळी माजी जि प सदस्य धनंजय मगळे संजय मगळे बाबा मगळे राहुल मगळे राज्य पाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी समाज बांधव उपस्थित होते

