माळी व कुणबी पाटील समाजाचा वतीने ग्रामदैवत मरीआई मंदीरात विधीव्रत पुजन कार्यक्रम संपन्न
1 min read

माळी व कुणबी पाटील समाजाचा वतीने ग्रामदैवत मरीआई मंदीरात विधीव्रत पुजन कार्यक्रम संपन्न

Loading

माळी व कुणबी पाटील समाजाचा वतीने ग्रामदैवत मरीआई मंदीरात विधीव्रत पुजन कार्यक्रम संपन्न

धरणगाव – पी डी पाटील सर

धरणगांव – सालाबादा प्रमाणे ह्या वर्षीय देखील येथील समस्त माळी समाज पंच मंडळ,व समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळ लहान माळी वाडा यांचा संयुक्त विद्यमानातुन श्रावण मास चा दुसरा मंगळवारी सकाळी आठ वाजता शहरातील ग्रामदैवत मरीआई मंदीरात पुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला
सदर कार्यक्रम माळी व पाटील समाज पंच भवना पासुन प्रारंभ होऊन वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली सदर मिरवणुक लहान माळी वाडा परीसरातुन गबा नंदा महाजन चौक, तेली विहीर, कोट बाजार,सिध्दी हनुमान व नवेगांवा हनुमान मंदिरावरून मरीआई मंदीरात विधीव्रत पुजन करून समारोप करण्यात आला मिरवणुक दरम्यान मारोती मंदीर,म्हसोबा मंदीर सह विविध मंदीरात नैवेद्य दाखवुन पुजन करण्यात आले.

मरीआई मंदीरात समारोपाचा कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार कडू महाजन यांनी आपल्या प्रास्ताविकातुन सालाबादा प्रमाणे होत असलेल्या परंमपरागत कार्यक्रमाचे महत्व विषद करुन ग्रामदैवत मरीआई मंदीराची विविध समाजाचे नागरीकांचे मोठ्या भक्ति व श्रध्देचे मोठे स्थान असल्याचे नमुद केले ह्या छोटेखानी कार्यक्रमात मरीआई संस्थानचा वतीने अध्यक्ष किशोर पहेलवान, व गोपाल पाटील,गोरख महाजन, यांनी माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन,व कुणबी पाटील समाजाचे अध्यक्ष माधवराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला मरीआई संस्थानचे सदस्य रमेश चौधरी यांनी आभार मानले.

या प्रसंगी शिवाजी देशमुख, विलास महाजन, भिमराज पाटील, महेश पाटील, राजेंद्र महाजन, दिलीप पाटील,भटुलाल महाजन, विजय महाजन,आप्पा पाटील,आनंद पाटील,दिपक महाजन,राजु महाजन (पाॅलीटीक) शांताराम मराठे,दयाराम महाजन, किशोर पाटील, किरण महाजन, भानुदास मराठे, कैलास पाटील, मनोज महाजन, अशोक झुंजारराव, गणेश निकम, सह विविध समाजाचे मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *