मातृशक्तीच्या आरोग्यासाठी समर्पित सेवा!” – हर्षाली व हर्षदा पाटील यांना शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय सन्मान
![]()
“मातृशक्तीच्या आरोग्यासाठी समर्पित सेवा!” – हर्षाली व हर्षदा पाटील यांना शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय सन्मान
अमळनेर प्रतिनिधी
ग्रामीण भागातील महिलांमध्ये कॅन्सर व मासिक पाळीविषयक गैरसमज दूर करत जनजागृती करणाऱ्या अमळनेर येथील हर्षाली गोपाल पाटील (मुळ रा. देवगांव देवळी) व हर्षदा गोपाल पाटील (मुळ रा. बहादरपूर) यांचा नुकताच उल्हासनगर, मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सखी सामाजिक महिला संस्था, मुंबई यांच्या वतीने शहीद जनरल अरुणकुमार वैद्य सभागृह, टाऊन हॉल उल्हासनगर येथे आयोजित कार्यक्रमात दोघींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सौ. हर्षदा गोपाल पाटील या WeRMore Solution Pvt. Ltd. या कंपनीमध्ये Platinum Director तर सौ. हर्षाली गोपाल पाटील हया Gold Director म्हणून कार्यरत आहेत. श्री. विकास गोपाळ हे सदर कंपनीचे CMD असून सौ. प्रिया कड मॅडम या M.D. आहेत. सदर कंपनी महिला आरोग्य काळजी व महिलांना रोजगार देखील उपलब्ध करुन देते. सौ. हर्षाली पाटील व सौ. हर्षदा पाटील या दोघांनी महिलांच्या आरोग्यविषयी विशेषतः मासिक पाळी संदर्भातील अंधश्रद्धा, प्रथा व गैरसमज याविरुद्ध धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये जनजागृती करून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. शाळांमध्ये जाऊन विद्यार्थिनींना मासिक पाळीविषयी योग्य माहिती देणे, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे आणि कॅन्सरविषयी भीती दूर करणे या विषयांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत संस्थेने त्यांना गौरविले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सखी सामाजिक संस्था उल्हासनगर, मुंबई येथील श्री. सचिन कदम सर, सौ. सिमरन मॅडम तसेच सौ. माधुरी महाजन यांनी परिश्रम घेतले. सन्मानप्रसंगी दोघांवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

