एक पेड मॉ के नाम” उपक्रमांतर्गत आदर्श माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपणाने साजरा झाला मातृसन्मान!
![]()
“एक पेड मॉ के नाम” उपक्रमांतर्गत आदर्श माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपणाने साजरा झाला मातृसन्मान!
धुळे प्रतिनिधी (मराठी लाईव्ह न्यूज)
धुळे येथील उद्यानपंडित बापूसाहेब माळी गुरुजी शिक्षण प्रसारक संस्था संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय, दोंदे कॉलनी, देवपूर येथे “एक पेड मॉ के नाम” या संकल्पनेवर आधारित भावनिक व पर्यावरणपूरक वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमात मातांच्या सन्मानार्थ त्यांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक आदरणीय श्री. ज्ञानेश्वर तात्यासाहेब सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माता-पालक भगिनी तसेच विद्यार्थीनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख श्रीमती संगीता चौधरी मॅडम व ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती ललिता रायते मॅडम यांनी केले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्गसंवर्धनाबरोबरच मातृप्रेमाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“आईप्रती कृतज्ञता व्यक्त करताना वृक्षारोपण केल्याने पर्यावरणसंवर्धनालाही हातभार लागत आहे,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

