“वाचनातून आरोग्य, शांती व सकारात्मकता मिळते” – ग्रंथ निवड समिती सदस्य सतीश पाटील यांचे प्रतिपादन
1 min read

“वाचनातून आरोग्य, शांती व सकारात्मकता मिळते” – ग्रंथ निवड समिती सदस्य सतीश पाटील यांचे प्रतिपादन

Loading

“ग्रंथ वाचा, आरोग्य वाढवा!” – सतीश पाटील सरांचा वाचनविषयक प्रेरणादायी सल्ला

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
ग्रंथ वाचनाने आरोग्य उत्तम असते असे
सतीश पाटील सर सदस्य ग्रंथ निवड समिती महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा अध्यक्ष जळगाव जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ जळगाव यांनी सांगितले.
आपणास आरोग्य उत्तम प्रकारे कसे राहावे यासाठी ग्रंथ वाचन केल्याने आरोग्य उत्तम राहू शकते सध्या ” वाचन “आता दूरदर्शन मोबाईल आणि इंटरनेट युट्युब अशा करमनुकिच्या अनेक साधनांमुळे ग्रंथ वाचन बरेच कमी झाले आहे काही अभ्यासाकांच्यामते कमी झालेल्या वाचनामुळे आता अनेक सामाजिक मानसिक प्रश्न निर्माण झालेले आहे सध्या आपल्या जीवनात सतत नकारात्मक विचारातून आपल्याकडे सकारात्मकच संपत आहे जर आपल्याला जीवनात बदल घडवायचा असेल तर आपण आपल्या जीवनशैलीत रोज ग्रंथ पुस्तक वाचन केले पाहिजे ग्रंथ वाचन केल्याने आपल्या आरोग्यावर खूप उत्तम प्रकारे त्याचा आपल्या जीवनशैलीत उपयोग होतो मानसशास्त्रीय विचार केल्यास ग्रंथ वाचन केल्यास आपण एक उत्तम उपचार पद्धती स्वीकारली स्वीकारत आहे असे लक्षात येते आपण नेहमी विनोदी ग्रंथ,गोष्टींचे पुस्तक,लहान कथा वाचन केल्याने सतत आपले मन शांत असते.
वाचनामुळे आपण स्वतःभोवती निर्माण केलेल्या अदृश्य भिंतींना शह देऊ शकतो व आपल्या मध्ये जो अहंकार असतो त्यापासून मुक्ती मिळते आपल्यात पूर्वी काडी निरक्षता होती तेव्हा वाचन हवंनातून केले जात होते आजही खेडेगावात ग्रामीण भागात भागवत रामायण कीर्तन सोहळा सप्ताह साजरे होतात ग्रंथ वाचनाचे आजही तेवढेच महत्त्व आहे म्हणून स्वतःशी बोला स्वतःला तोला पण त्यासाठी हवा नित्य वाचन मेळा
म्हणून वाचन केल्याने आपल्याला ग्रंथात आलेले नवीन शब्द शिकायला मिळतात त्यामुळे आपली भाषा अधिक प्रभावी आणि समृद्ध होते वाचन केल्याने एकाग्रता वाढते ताण कमी होतो कल्पनाशक्तीला चालना मिळते सर्जनशीलता वाढते भावनिक बुद्धिमत्ता वाढते ग्रंथ वाचन हा उत्तम व उत्कृष्ट मनोरंजनाचा प्रकार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *