सामाजिक सेवेत अग्रणी! रोटरी क्लब अमळनेरचा भव्य गौरव रोटरी क्लब अमळनेरचं उल्लेखनीय कार्य – सन्मान 2024-25 मध्ये झळकले 9 पुरस्कारांनी
![]()
सामाजिक सेवेत अग्रणी! रोटरी क्लब अमळनेरचा भव्य गौरव
रोटरी क्लब अमळनेरचं उल्लेखनीय कार्य – सन्मान 2024-25 मध्ये झळकले 9 पुरस्कारांनी
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन):
रोटरी क्लब अमळनेरने आपल्या सामाजिक बांधिलकीचा ठसा पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या “सन्मान 2024-25” या रोटरी पुरस्कार वितरण समारंभात, रोटरी क्लब अमळनेरला त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल एकूण ९ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
रोटरी वर्ष 2024-25 मध्ये अमळनेर क्लबने समाजोपयोगी, पर्यावरणपूरक, युवक कल्याण, नैसर्गिक आपत्तीमधील मदतकार्य अशा विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. चंद्रपूर ते नाशिकपर्यंतच्या १०० क्लब्स आणि ५००-६०० सभासदांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला.
या कार्यक्रमात रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. राजिंदरसिंगजी खुराणा व त्यांच्या टीमने क्लबच्या कार्याचे कौतुक करत ९ विविध पुरस्कार बहाल केले.
रोटरी क्लब अमळनेरचे अध्यक्ष रो. ताहा बुकवाला म्हणाले, “हा सन्मान प्रत्येक सभासदाच्या निःस्वार्थ मेहनतीचं फलित आहे. याचे श्रेय सर्वांनाच जाते.”
अमळनेर क्लबला मिळालेले ९ गौरव पुरस्कार पुढीलप्रमाणे
ग्राहक जागृती मार्गदर्शन पुरस्कार,
नैसर्गिक आपत्तीच्या काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार, युवकांसाठी दिलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार,सार्वजनिक संबंध क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार,पर्यावरण विकास प्रकल्प – “पृथ्वीचे रक्षण” उपक्रमासाठी पुरस्कार,जिल्हा सार्वजनिक प्रतिमा सेमिनारबद्दल कौतुक पुरस्कार,
सहायक गव्हर्नर रो. अभिजीत भांडारकर यांना दिलेला गौरव पुरस्कार,क्लब उत्कृष्टता पुरस्कार, रो. ताहा बुकवाला यांना “डायमंड सायटेशन ऑफ एक्सलन्स” पुरस्कार असे नऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्कारामुळे अमळनेर शहरासह रोटरी डिस्ट्रिक्टमध्ये देखील क्लबच्या कार्याची प्रशंसा होत आहे.
“अमळनेर क्लबने सामाजिक जाणीवेतून जे कार्य केले ते इतर क्लबसाठी प्रेरणादायी ठरत आहे,” असे प्रतिपादन रो. अभिजीत सुभाष भांडारकर (ए.जी.) यांनी केले.


