श्रावणात भक्तीमय गंगाजळ! श्री मंगळग्रह मंदिरात रुद्राभिषेकाने गुंजला हर हर महादेव , अंतुर्ली येथील नितीन पाटील सपत्नीक पूजेचे मानकरी; भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
![]()
श्रावणात भक्तीमय गंगाजळ! श्री मंगळग्रह मंदिरात रुद्राभिषेकाने गुंजला हर हर महादेव
अंतुर्ली येथील नितीन पाटील सपत्नीक पूजेचे मानकरी; भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
अमळनेर प्रतिनिधी
श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात दर वर्षाप्रमाणे दर सोमवारी मंगळेश्वर शिवलिंगावरती रुद्राभिषेक करण्यात येतो.
४ रोजीच्या दुसऱ्या सोमवारी बिजासनी माता आश्रम शाळा, अंतुर्लीचे चेअरमन नितीन रामभाऊ पाटील हे सपत्नीक पूजेचे मानकरी होते. भक्तिमय व चैतन्यमय वातावरणात गणपती पूजन करून महादेवांचा अभिषेक करण्यात आला. मंदिराचे पुरोहित गणेश जोशी आणि तुषार दीक्षित यांनी पौराहित्य केले. त्यांना गोपाल पाठक यांचे सहकार्य लाभले. महाआरती करून रुद्राभिषेकाची सांगता झाली.
यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, बाळा पवार तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

