संवेदनशीलतेकडून सेवा भावनेपर्यंत… देहदान-अवयवदान जनजागृती उपक्रमातून विद्यार्थ्यांचे सामाजिक भान!”
1 min read

संवेदनशीलतेकडून सेवा भावनेपर्यंत… देहदान-अवयवदान जनजागृती उपक्रमातून विद्यार्थ्यांचे सामाजिक भान!”

Loading

“संवेदनशीलतेकडून सेवा भावनेपर्यंत… देहदान-अवयवदान जनजागृती उपक्रमातून विद्यार्थ्यांचे सामाजिक भान!”

जळगाव प्रतिनिधी

जळगाव येथील ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या वतीने देहदान व अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे उद्दिष्ट समाजात संवेदनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सेवा वृत्ती निर्माण करणे हे होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सचिन नरवाडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शरीररचना, आयुर्वेदाची संकल्पना, तसेच देहदान व अवयवदानाची गरज व प्रक्रिया याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी प्रतिनिधी चैतन्य बडगुजर यांच्या प्रास्ताविकाने झाली. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी यावेळी प्रभावी घोषवाक्ये, माहितीपूर्ण पोस्टर प्रदर्शन आणि प्रबोधनपर चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांना विषयाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक श्री. नरेंद्र पालवे यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन श्री. चंद्रकांत कोळी सर यांनी तर संयोजनासाठी श्री. महेंद्र मिरकुटे आणि श्री. वेदप्रकाश आर्य सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थीवर्गात केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर सामाजिक भान, माणुसकी आणि जबाबदारीची जाणीवही निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *