साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी :- सुनिता मोरे
![]()
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी :- सुनिता मोरे
अमळनेर: दि.(प्रतिनिधी) : “आम्हीही माणस आहोत, आम्हालाही स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी, दलित, व शेतकरी यांच्या तळहातावर तरलेली आहे. अशी गर्जना करणारे अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजच्या समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन वक्त्या तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ सुनीता हृदयनाथ मोरे यांनी केले.
युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाच्या अंतर्गत शहरातील एन टी मुंदडा हायस्कूल येथील कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. सुरुवातीला अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री नरेंद्र पाटील उपस्थित होते.
यावेळी सुनीता मोरे यांनी आपल्या खास शैलीतून विद्यार्थ्यांसमोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट उलगडला. तसेच काही गाण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची संवाद साधला. यावेळी काही विद्यार्थ्यांनीही अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या विषयी भाषण करून उत्साह दाखविला.
कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


