सार्वजनिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे* *यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन*
![]()
*सार्वजनिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे* *यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन*
आसोदा :- सार्वजनिक विद्यालय असोदा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारलेला व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची प्रतिकृती साकारलेला विद्यार्थी कृष्णा कुंभार, लोकमान्य टिळक यांची प्रतिकृती साकारलेला विद्यार्थी लोकेश वाघ, मुख्याध्यापक डॉ.मिलिंद बागुल, पर्यवेक्षक लालसिंग पाटील,प्रमुख पाहुणे प्रशांत कोल्हे, एल. जे.भुगवड्या यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवनप्रवास पोवाड्यातून सादर केला. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित जीवन प्रवास विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी नाटकाद्वारे सादर केला. चेतन आढळकर, कावेरी सोनवणे, ओम सोनार, दर्शन चव्हाण, देवयानी कोळी, श्रावणी कोळी,देवयानी सोनवणे,देवयानी कोळी , वैशाली मगरे,कुणाल वाणी या विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांच्या कार्याविषयी माहिती सांगून आपले मनोगत व्यक्त केले. प्रशांत कोल्हे यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या सामाजिक व राजकीय कार्याविषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख शुभांगीनी महाजन यांनी तर आभार एल. जे. भुगवड्या यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

