समाजकार्य महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती अभिवादन व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने व्याख्यान संपन्न…
1 min read

समाजकार्य महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती अभिवादन व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने व्याख्यान संपन्न…

Loading

समाजकार्य महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती अभिवादन व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्ताने व्याख्यान संपन्न…

अमळनेर –

दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अंमळनेर येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादन पर कार्यक्रम घेण्यात आला. अभिवादन कार्यक्रमानिमित्त चोपडा समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. राहुल निकम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथी व उपस्थित प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या हस्ते दोन्हीही महान विभूतींच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ.राहुल निकम यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव समाजकार्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मांडला. प्रतिकूल परिस्थिती असताना देखील देश पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे कसा येईल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे कार्य उपस्थिताच्या लक्षात आणून दिले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्यसंग्रामात केलेले उल्लेखनीय कार्य, कामगारांचे प्रश्न, फकीरा कादंबरीच्या माध्यमातून त्यांना मिळालेले पुरस्कार इत्यादी गोष्टींचा उहापोह त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सांगितला. यामिनी माळी आणि राजेंद्र चौधरी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. पी एस पाटील , विभाग प्रमुख प्रा. डॉ. जगदीश सोनवणे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. अस्मिता सरवैया, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ अनिता खेडकर, क्रीडा संचालक प्रा. डॉ. श्वेता वैद्य ज्येष्ठ प्रा. डी आर ढगे, प्रा. डॉ.भरत खंडागळे प्रा. डॉ. एस आर चव्हाण, प्रा. विजयकुमार वाघमारे, प्रा अशोक पवार उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *