अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला आणि लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रविचारांना अभिवादन , पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात जयंती व पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन
1 min read

अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला आणि लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रविचारांना अभिवादन , पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात जयंती व पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन

Loading

अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला आणि लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रविचारांना अभिवादन

पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात जयंती व पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन

अमळनेर प्रतिनिधी :
समाज परिवर्तनाचे प्रणेते, थोर साहित्यिक व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच स्वराज्याचे प्रणेते, निर्भीड पत्रकार व राष्ट्रनेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले, तर वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले.
याप्रसंगी साने गुरुजी वाचनालयाचे सदस्य प्रसाद जोशी, वाचनालयाचे कर्मचारी मधुकर बाळापुरे, हरीश जाधव तसेच वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून वंचित, शोषित घटकांच्या वेदनांना आवाज दिला, तर लोकमान्य टिळकांनी आपल्या लेखणी व विचारांच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाला सदैव प्रेरणा देत राहील, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

वाचन संस्कृती वाढविण्याचे कार्य करणाऱ्या साने गुरुजी ग्रंथालयाच्या वतीने अशा प्रेरणादायी महापुरुषांच्या स्मृतींना उजाळा देत सामाजिक व वैचारिक बांधिलकी जपण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *