“पूरग्रस्तांच्या मदतीला देसले दांपत्य धावले; नुकसानग्रस्त भागांची केली पाहणी”
![]()
शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी; शासनाकडून तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – सुषमाताई देसले
अमळनेर प्रतिनिधी
अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे अमळनेर तालुक्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या संकटाच्या काळात शेतकरी व नागरिकांच्या मदतीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका तथा शेती संघाच्या संचालिका, माजी सरपंच सुषमाताई देसले आणि सेवानिवृत्त डीवायएसपी वासुदेव देसले यांनी नुकसानग्रस्त भागांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत व योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अमळनेर तालुक्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, पिके, शेती साहित्य तसेच साठवलेल्या मालाचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर शिरल्याने धान्य वाहून गेले असून मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून संबंधित प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर देण्याचे काम देसले दांपत्याने केले असून, त्यांच्या भेटीमुळे नुकसानग्रस्तांना मोठा आधार मिळाला

