युवा नेतृत्वाची जोरदार घडामोड! दीपक पाटील यांची आ. एकनाथ खडसे यांच्याशी राजकीय चर्चा
1 min read

युवा नेतृत्वाची जोरदार घडामोड! दीपक पाटील यांची आ. एकनाथ खडसे यांच्याशी राजकीय चर्चा

Loading

युवा नेतृत्वाची जोरदार घडामोड! दीपक पाटील यांची आ. एकनाथ खडसे यांच्याशी राजकीय चर्चा

अमळनेर प्रतिनिधी
वाघोदे (ता. अमळनेर) येथील युवक आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील यांनी नुकतीच माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांची विशेष भेट घेतली. या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
पाटील यांनी खडसे साहेबांकडे निवडणुकीत प्रामाणिक, तरुण व कामाला लागणाऱ्या उमेदवारांना संधी द्यावी अशी मागणी केली. यावर खडसे साहेबांनीही सकारात्मक प्रतिसाद देत, “आण्णा साहेब कै. धनगर अर्जुन पाटील हे वाघोदे गावातील एक ओळखीचं व आदरणीय व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्या कार्याची आठवण आजही आम्हाला आहे,” असे सांगितले.
खडसे साहेबांनी दीपक पाटील वाघोदेकर यांना पंचायत समिती निवडणुकीत संधी मिळावी यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. या भेटीमुळे वाघोदे परिसरात नवीन राजकीय घडामोडींची चाहूल लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *