डॉ. कलाम पुण्यतिथीनिमित्त रामेश्वरममध्ये मिलिंद चौधरी यांचा इसरो अध्यक्षांच्या हस्ते सन्मान
![]()
डॉ. कलाम पुण्यतिथीनिमित्त रामेश्वरममध्ये मिलिंद चौधरी यांचा इसरो अध्यक्षांच्या हस्ते सन्मान
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या १०व्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे एक भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात इसरोचे चेअरमन डॉ. व्ही. नारायणन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. इस्माईल अहमद, इसरोचे शास्त्रज्ञ श्री. गोकुळ आणि कलाम कुटुंबीयांनी आपली उपस्थिती नोंदवली. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा या वेळी गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात स्टेम शिक्षण क्षेत्रात घेत असलेल्या अथक मेहनतीसाठी डॉ. व्ही. नारायणन यांच्या हस्ते सत्कार होण्याचा मान मला मिळाला, अशी भावना मिलिंद चौधरी, सचिव, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन यांनी व्यक्त केली. “असा योग दुर्मिळ असतो,” असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. कलाम यांच्या स्मृती जागवणारा आणि युवकांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम सर्वार्थाने यशस्वी ठरला.

