ज्ञानाची मशाल पेटवणारी –महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीचा गौरवशाली प्रवास!  सतीश दशरथ पाटील सदस्य- महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती नाशिक विभाग नाशिक
1 min read

ज्ञानाची मशाल पेटवणारी –महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीचा गौरवशाली प्रवास! सतीश दशरथ पाटील सदस्य- महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती नाशिक विभाग नाशिक

Loading

ज्ञानाची मशाल पेटवणारी –महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीचा गौरवशाली प्रवास!

सतीश दशरथ पाटील
सदस्य- महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती नाशिक विभाग नाशिक

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आपल्या महाराष्ट्राची ओळख ही संत परंपरा विचारातून शब्द ते संस्कृती पर्यंतच्या प्रवासातून घडलेली आहे या भूमीत पुस्तकांना पुजले गेले वाचनाला संसार समजले गेले आणि ग्रंथालयांना मंदिर मानले गेले ज्ञानाच्या या पवित्र प्रवाहातूनच महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळीचा उज्वल वारसा निर्माण झाला आहे
महाराष्ट्र ही जशी संतांची शूरवीरांचे आणि समाज सुधारकांची भूमी आहे तशीच ही भूमी शब्दांच्या संस्काराने घडलेली आहे इथल्या मातीचा गंध केवळ शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही तर तर त्या मातीत पुस्तक वाचणाऱ्याच्या डोळ्यात प्रकाश फुलवला आहे शब्द इथे साधन नाही तर संस्कृतीचे मूळ आहे आणि त्या शब्दांवरती गुंफलेली एक व्यापक लोकाभिमुख आणि वैचारिक चळवळ म्हणजे महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळ 19 व्या शतकात सार्वजनिक शिक्षणाचा पूरक म्हणून जन्मलेल्या या चळवळीने महाराष्ट्रातील एक नवा सांस्कृतिक झरा निर्माण केला आहे बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड पासून ते महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या स्थापनेपर्यंत ही केवळ ग्रंथाची नव्हे तर विचारांची वाटचाल होती सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम 1967 हा या वाटचालीतील मोलाचा दगड ठरला ज्यामुळे ग्रंथालयाची बांधणी व्यवस्थापन आणि लोकांपर्यंत पोहोचले त्याला अधिकृत पाठबड मिळाले ग्रंथालय म्हणजे केवळ पुस्तके ठेवण्याचे साधन नव्हे तर ती एक विचारांची कार्यशाळा आहे तिथे अक्षरांमध्ये भविष्य घडते आणि वाटणाऱ्याच्या शांततेत क्रांतीचे बीजे रोवली जातात महाराष्ट्रातील गावागावातून कार्यरत असलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांनी व राज्याच्या वैचारिक पातळीला एक उंची दिली आहे ग्राउंड भागातील एखाद्या झोपडी सारख्या ग्रंथालयात सुद्धा कोणीतरी स्वप्नांची पाने चाढतो आहे हे याच्यावरील खरं यशआहे ही चळवळ उभी राहिली की स्वयंसेवी संस्थांच्या कष्टातून वाचन चढून कार्यकर्त्यांच्या जिद्दीतून आणि सर्वसामान्य वाचकांचे सहभागातून महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ ही चळवळ ची आत्म ठरली आहे त्यांनी केवळ ग्रंथालय उभारले नाहीत तर ज्ञानदाते तयार केले आजही हि चळवळ महाराष्ट्रात विविध स्वरूपातून सुरू आहे शासनाच्या अनुदानातून आणि स्थानिक प्रयत्नातून अनेक नवीन ग्रंथालय उभी राहत आहे मात्र अजूनही अनेक गावात ग्रंथालय पोस्ट नाहीत ही जाणीव असे हे काही ठिकाणी या चळवळीत महत्त्व विसरले जात आहे तरी जिथे एखाद्या शिक्षक शाळेच्या कोपऱ्यात वाचणारे सुरू करतो जिथे एखादी महिला स्वतःच्या घरात ग्रंथ संच साठवून गावातून मुलांना बोलवते तिथेही चळवळ खऱ्या अर्थाने जिवंत आहे महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळ म्हणजे एक प्रकारचा मुक्त विद्यापीठ आहे ही चळवळ म्हणजे सामाजिक समता संस्कृतीची जाणीव आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे माध्यम आहे शब्द हे इथे देवते सारखे पुजले जातात आणि त्यातून उभी राहते ती संस्कृती जी वाचन संस्कारातून घडते वैचारिक स्वप्नांकडे आज डिजिटल युग म्हणत अनेक गोष्टी स्क्रीनवर शिफ्ट होत असतानाही ग्रंथालयाचे महत्त्व संपलेले नाही ग्रंथ हे महाराष्ट्राचा सामाजिक प्रगतीचा आरसा ही केवळ पुस्तकी गोष्ट नाही तर एक समाजाचे वैचारिक भूक सामावणारी शांत ज्ञानमंदिर आहे

One thought on “ज्ञानाची मशाल पेटवणारी –महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीचा गौरवशाली प्रवास! सतीश दशरथ पाटील सदस्य- महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती नाशिक विभाग नाशिक

  1. सर्व क्षेत्रांमध्ये काम करणारे चालता बोलतो विद्यापीठ म्हणजे एच.डी.पाटील सर
    आपल्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
    शुभेच्छुक संपतराव वाघचौरे अहिल्यानगरकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *