गजर भक्तीचा… स्वरांमधून भक्तिरसाची उधळण!”  मराठा महिला मंडळ अमळनेर आयोजित अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
1 min read

गजर भक्तीचा… स्वरांमधून भक्तिरसाची उधळण!” मराठा महिला मंडळ अमळनेर आयोजित अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Loading

गजर भक्तीचा… स्वरांमधून भक्तिरसाची उधळण!”

मराठा महिला मंडळ अमळनेर आयोजित अभंग गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
मराठा महिला मंडळ अंमळनेर तर्फे अभंग गायन स्पर्धा उत्स्फूर्तपणे पार पडली. अभंग गायन स्पर्धा ही ग्रुप गायन व एकल गायन या दोन भागात ठेवली होती. या स्पर्धेस खूपच चांगल्या प्रतिसाद महिलांकडून मिळाला ,या स्पर्धेसाठी परीक्षकांची भूमिका सौ. मोहिनी खाडिलकर व सौ स्वाती बोरकर यांनी निपक्षपातीपणे पार पाडली. श्रवणीय अशा झालेल्या या स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे आहेत. ग्रृपमधील विजेते …..प्रथम पारितोषिक – गजर भक्तीचा …या गृप मध्ये विजया पाटील, माधुरी पाटील, श्वेता पाटील, मोनाली पाटील शैलजा पाटील पल्लवी पाटील ,अश्विनी गरुड व कोमल पाटील यांचा सहभाग होता.
दुसरे बक्षीस -श्री गणेश ग्रुप यांना मिळाले — यात सुरेखा पाटील व मनीषा पाटील यांचा सहभाग होता. तिसरे बक्षीस – संस्कार ग्रुप यांना मिळाले – यात ललिता पाटील व भारती पाटील यांचा सहभाग होता.
एकल स्पर्धेतील बक्षिसे खालील प्रमाणे — पहिला क्रमांक प्रियदर्शनी भोसले यांचा तर दुसरा क्रमांक सरोज देसाई व तिसरे बक्षीस विद्या गणेश पाटील यांना मिळाले.
या अशा सुंदर कार्यक्रमात परीक्षकांचा परिचय सौ अलका विनोद पाटील यांनी करून दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमल पाटील यांनी केले तसेच महत्त्वाचे म्हणजे सूत्रसंचालन सुलोचना वाघ व सुनीता पाटील यांनी खूप छान केले. या कार्यक्रमासाठी तिलोत्तमा पाटील ,जयश्री पाटील ,लीना पाटील, रागिणी पाटील यांनी मदत केली. अध्यक्षिय भाषण मंडळाच्या अध्यक्षा प्रा.शीला पाटील यांनी केले व शेवटी मनीषा पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. अशाप्रकारे या महिन्याची ही स्पर्धा अतिशय विलक्षनीय ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *