पुणे जिल्हाध्यक्षपदी अजित साळुंके यांची निवड
1 min read

पुणे जिल्हाध्यक्षपदी अजित साळुंके यांची निवड

Loading

पुणे जिल्हाध्यक्षपदी अजित साळुंके यांची निवड

लोणी काळभोर- गोल्डन स्पोर्ट अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष, माहिती सेवा समिती हवेली चे उपाध्यक्ष अजित साळुंके यांची ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. साधना सहकारी बँक माजी व्हाईस चेअरमन विद्यमान संचालक बाळासाहेब कोळपे व
ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. या निवडीबद्दल ग्रीन फाउंडेशन सचिव प्रतीक कोळपे,
ग्रीन फाउंडेशन उपाध्यक्ष तुषार महाजन, सोशल मीडिया अध्यक्ष गहिनीनाथ राजे, हवेली तालुका अध्यक्ष गणेश काळभोर, ग्रीन फाउंडेशन सदस्य शिवाजी काळभोर, नितीन काळभोर, विशाल लष्कर, दीपक महानवर, दादा कोळपे, बिरूदेव भास्कर, जीवन जाधव, संतोष झेंडे, किरण भास्कर, राहुल कुंभार, किरण भोसले, अमित कुंभार , शुभम जाधव, राहुल जाधव आदींनी त्यांचे स्वागत केले.वृक्ष संवर्धन मोहीम, वृक्षारोपण कार्यक्रम, शाखा विस्तार, सभासद नोंदणी मोहीम, आरोग्य शिबीर, गरजू विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप, रक्तदान शिबीर, शाळांमध्ये महाविद्यालयात वृक्ष संवर्धन कार्यक्रमांचे आयोजन, निंबंध, वत्कत्व स्पर्धा आयोजित करणे, निसर्गाच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना राबविणे, झाडे लावा झाडे वाढवा. वृक्ष चळवळ हरित चळवळ . निसर्गाची साखळी टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे संवर्धन करणे काळची गरज आहे ग्रीन फाऊंडेशन चे कार्य संपूर्ण भारत भर पोहचून ५ कोटी वृक्ष लावून जगवण्याचे ध्येय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *