कारगिल विजय दिवसानिमित्त लष्करी अधिकारी व जवानांचा सन्मान!
![]()
कारगिल विजय दिवसानिमित्त लष्करी अधिकारी व जवानांचा सन्मान!
अमळनेर प्रतिनिधी – येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये कारगिल विजय दिवसानिमित्त लष्करी अधिकारी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आर्मी स्कूलच्या छोट्या जवानांनी पथसंंचालनाद्वारे मानवंदनाही दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर शाळेचे कमांडंट लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे, माजी प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, नायब सुभेदार भटू पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, सुभेदार ए.के पाटील, हवालदार डी डी शिंदे यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर कारगिल युद्धात सहभागी असलेले नायब सुभेदार भटू पाटील यांनी युद्धातील थरारक प्रसंग अनुभव कथन केले. कारगिल युद्धात री कॅप्चर केलेल्या एका तुकडीचे रक्षण करणारे लेफ्टनंट कर्नल विजयसिंह थोपटे यांनीही त्यावेळच्या प्रसंगांचा अनुभव कथन केले. यावेळी नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड,प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील ,प्राचार्य अनिल पाटील, कविता पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी घोडेस्वार प्रशिक्षक गणेश पाटील यांनी घोड्याची विविध प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यानंतर विद्यार्थ्यांनीही रायफल शूटिंग रेंज सह विविध लष्करी प्रात्यक्षिके करून दाखवलेत. सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे व शरद पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
———
अमळनेर- कारगिल युद्धात सहभागी शहिदांना आदरांजली प्रसंगी उपस्थित सुभेदार मेजर नागराज पाटील व विद्यार्थी.

