समता शिक्षक परिषदेच्या विविध विभागाच्या जिल्हा कार्यकारिणी निवड प्रक्रिया उत्साहात संपन्न* *माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. भरत शिरसाठ यांनी केल्या कार्यकारिणी जाहीर*
![]()
*समता शिक्षक परिषदेच्या विविध विभागाच्या जिल्हा कार्यकारिणी निवड प्रक्रिया उत्साहात संपन्न*
*माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. भरत शिरसाठ यांनी केल्या कार्यकारिणी जाहीर*
जळगांव प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे राज्य अधिवेशन दिवाळी सुट्टी कालावधीमध्ये जळगाव येथे प्रस्तावित असून सदर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याच्या विविध विभागाच्या ॲडहाॅक जिल्हा कार्यकारिणी आज संघटनेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत जाहीर करण्यात आल्या. याप्रसंगी निवड समितीचे प्रमुख धनराज मोतीराय प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. जळगाव येथे माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे संघटनेच्या विशेष सभेचे आयोजन आज दि. 27 जुलै रोजी करण्यात आले होते.
संस्थांमधील संचालक मंडळातील वादाचा फटका शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर बसत असून शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य खराब होत आहे आणि परिणामतः विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावित होत आहे. या संदर्भात शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे मत प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांनी याप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलतांना व्यक्त केले.
सन 2025 ते 2030 या कालावधी करिता कार्यकारिणींची निवड करण्यात आली असून आगामी राज्य अधिवेशन यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी सर्व पदाधिकाऱ्यांवर असणार आहे.
खालील प्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
*जळगाव पूर्व विभाग*
जळगाव पूर्व विभागाच्या प्रशासकीय विंगच्या जिल्हाध्यक्षपदी श्री. योगेश गांधेले (भुसावळ), उपक्रम विंगच्या जिल्हाध्यक्षपदी श्री. एम. आर. चौधरी (वरणगाव), महिला विंगच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. मनीषा देशमुख (भुसावळ) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री रवींद्र सोनवणे (किनगाव) यांची कार्याध्यक्षपदी, सादिक तडवी (जामनेर) व श्रीमती शुभांगी चौधरी (शेंदुर्णी) यांची जिल्हा उपाध्यक्षपदी व युवराज कुरकुरे (वरणगाव) यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली.
*जळगाव पश्चिम विभाग*
जळगाव जिल्हा पश्चिम विभागाच्या प्रशासकीय विंगच्या जिल्हाध्यक्षपदी श्री भैय्यासाहेब सोनवणे (आडगाव), उपक्रम विंगच्या जिल्हाध्यक्षपदी सौ. छाया सोनवणे/ बैसाणे(चाळीसगाव) यांची तर महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी वर्षा अहिरराव (मेहरुण, जळगाव) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री. हेमेंद्र सपकाळे (धामणगाव) यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी, रावसाहेब वानखेडे(पारोळा), श्री. प्रकाश तामस्वरे(तळई), श्री. एस.आर.महाजन (जळगाव) व सौ. नीता पाटील(चाळीसगाव) यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, श्री. सोपान भवरे(अमळनेर) व सौ भारती ठाकरे(शिरसोली) यांची सचिव पदी, सौ. शैला जाधव (अमळनेर) यांची जिल्हा सहसचिव पदी तर श्री. मुकेश बुंदे (बोदवड) व श्री.श्रावण सोनवणे (धरणगाव) यांची जिल्हा संघटक पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री. अजय भामरे (अमळनेर) यांची पुन्हा नव्याने प्राथमिक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्राथमिक विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी श्री. जिवन शिरसाट(जळगाव) यांची तर सचिव पदी सौ. प्रज्ञा तायडे (कुसुंबा, जळगाव) यांची निवड करण्यात आली. श्री.शंकर भामेरे (पहुर) यांची टप्पा अनुदान विभागाच्या समन्वयकपदी निवड करण्यात आली. जळगाव शहर महानगर अध्यक्षपदी श्री. टी. बी. पांढरे (जळगाव) यांची निवड करण्यात आली.
सदर प्रसंगी नाशिक येथील राज्य कार्यकारिणीच्या सभेत निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात समाविष्ट श्री. रणजीत सोनवणे (शेंदुर्णी) यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, श्री प्रवीण केदार(एरंडोल) यांची प्रदेश सहसचिव पदी, श्री बी.टी. सपकाळे(रावेर) यांची प्रदेश सहकोषाध्यक्षपदी, श्री बी. एन. पाटील(भडगाव) यांची प्रदेश कार्यकारिणी संघटक पदी, श्री. गणेश बच्छाव(म्हसावद) यांची खानदेश विभाग अध्यक्षपदी, सौ. सरिता वासवानी(भुसावळ) यांची खानदेश विभाग महिला विंग अध्यक्षपदी, श्री प्रमोद आठवले (भुसावळ) यांची उत्तर महाराष्ट्र विभाग कार्याध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी प्रमोद आठवले व धनराज मोतीराय यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री. रणजित सोनवणे यांनी सभेचे प्रास्ताविक केले तर सर्व निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. भरत शिरसाठ यांच्यावर विश्वास व्यक्त करून संघटनेच्या ध्येय धोरणानुसार कार्य करण्याचा सदर प्रसंगी मानस व्यक्त केला. श्री. चिंतामण जाधव यांनी सभेचे आभार व्यक्त केले.

