कुपोषणमुक्त गावाच्या दिशेने! ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे येथे कुपोषित बालक व गर्भवती महिलांसाठी पौष्टिक खाऊ वाटप
![]()
कुपोषणमुक्त गावाच्या दिशेने!
ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे येथे कुपोषित बालक व गर्भवती महिलांसाठी पौष्टिक खाऊ वाटप
अमळनेर प्रतिनिधी
पिंपळे (ता. अमळनेर) येथे बालिका स्नेही पंचायत व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने कुपोषित बालक व गर्भवती महिलांना पौष्टिक खाऊ वाटपाचा उपक्रम पार पडला.
या उपक्रमाचे अध्यक्षस्थान बालविकास अधिकारी प्रेमलता पाटील मॅडम, तर प्रमुख उपस्थित प्रवेशशिका सुजाता शिरुड मॅडम होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात बालिका स्नेही पंचायतच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून झाली. यानंतर प्रेमलता मॅडम यांनी उपस्थित महिलांना योग्य आहाराचे महत्त्व समजावून सांगत गर्भवतींनी दररोज खजूर, मनुके, काजू, अंडी, राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाण्याची चिक्की, तीळाचे लाडू आहारात समाविष्ट करावेत, असे मार्गदर्शन केले.
आजच्या उपक्रमात उपस्थित लोकनियुक्त सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील, उपसरपंच मिनाबाई सतीश पाटील, सदस्य संतोष चौधरी, पुरुषोत्तम चौधरी, सुदाम पाटील, आधार पाटील, गुलाबराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील आणि अंगणवाडी सेविका लताताई चौधरी, निर्मलाबाई चौधरी व मदतनीस यांचे मोलाचे योगदान लाभले.
कार्यक्रमात पौष्टिक खाऊ स्वरूपात केळी, खजूर, चिक्की, लाडू, अंडी यांचे वाटप करण्यात आले.
एक महिन्यानंतर कुपोषित बालकांचे आणि गर्भवतींचे वजन मोजून त्यामध्ये झालेला बदल तपासण्यात येणार आहे.
हा उपक्रम ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वी झाला असून गाव कुपोषणमुक्त व्हावे, यासाठी ग्रामपंचायत व बालिका स्नेही पंचायत कटिबद्ध आहे.

