सामाजिक न्याय ,समता, स्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज. , एकाच वेळी 90 ठिकाणी व्याख्याने –युवा कल्याण प्रतिष्ठानचा उपक्रम.
![]()
सामाजिक न्याय ,समता, स्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज.
एकाच वेळी 90 ठिकाणी व्याख्याने –युवा कल्याण प्रतिष्ठानचा उपक्रम.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
छत्रपती शाहू महाराजांनी महिलांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र शाळा व वस्तीगृह उभारले, देवदासी प्रथेवर बंदी घातली, प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले, स्वतःच्या खर्चाने अनेक विद्यार्थ्यांना परदेशात पाठवले, औद्योगिक व तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले, मागासवर्गीयांना नोकरीत 50 टक्के आरक्षण लागू केले, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले ,अस्पृश्य व मागासवर्गीय शेतकऱ्यांना शेतीसाठी जमीन दिली, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या मूल्यांची अंमलबजावणी छत्रपती शाहू महाराजांच्या काळातच झाली हा वारसा पुढे चालवण्यासाठी सामाजिक न्यायाचा जागर करण्याचा निर्धार युवा कल्याण प्रतिष्ठानच्या सर्व वक्त्यांनी केला अमळनेर शहरात व तालुक्यात 90 ठिकाणी 151 व्या छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादनाचे व व्याख्यानाचे कार्यक्रम झाले. छत्रपती शाहू महाराजांच्या व्यक्तिमत्व ,कर्तुत्व व नेतृत्वाविषयी माहिती अमळनेर तालुक्यात सुमारे 30हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. हा प्रबोधन पर व महत्त्वकांक्षी उपक्रम राबविण्याचे युवा कल्याण प्रतिष्ठानचे चौथे वर्षे होते. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा अशोक पवार यांनी दिली. शासकीय आर्थिक मदतीशिवाय हा उपक्रम राबविला जात आहे.
वक्त्यांची कार्यशाळा
छत्रपती शाहू महाराजांविषयी व्याख्याने देण्यासाठी 22 जून 2025 रोजी वक्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन, धनदाई संस्थेचे चेअरमन नानासाहेब डी डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. याप्रसंगी माजी गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, प्रा.डॉ राहुल निकम यांनी मार्गदर्शन केले .कार्यशाळेत प्रा डॉ. लीलाधर पाटील ,संदीप घोरपडे , अनिता बोरसे, वैशाली शेवाळे, डी एम पाटील, बापूराव ठाकरे, डी ए पाटील, संजय पाटील ,अशोक पाटील, गौतम मोरे, चिंधु वानखेडे आदी मान्यवर वक्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . याप्रसंगी सोपान भवरे सरांनी तयार केलेले शाहू महाराजांवरील वाचन साहित्य सर्वांना देण्यात आले.
युवा कल्याण प्रतिष्ठानच्या या अभिनव व नाविन्यपूर्ण उपक्रमात वक्ते म्हणून प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व सीनियर कॉलेजचे शिक्षक, महिला, ज्येष्ठ नागरिक ,सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार, युवक इत्यादींचा समावेश असतो. कोणीही वक्ता मानधन व प्रवास खर्च घेत नाही .सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या सहकार्याने सदर उपक्रम राबवला जातो. शाहू महाराजांच्या कर्तृत्वाविषयी सुमारे 350 विद्यार्थी वक्त्यांनी आपल्या शाळांमध्ये भाषणे केली. छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर लिहिलेले शिवश्री बापूराव ठाकरे यांचे पुस्तक विद्यार्थी वक्त्यांना बक्षीस म्हणून देण्यात आले. राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानात सहभागी होऊन ,महापुरुषांच्या विचारांच्या प्रचार करावा असे आवाहन प्रा. अशोक पवार यांनी केले.

