भारतीय लोकशाहीला वाचविण्यासाठी संविधान संमेलनाची आवश्यकता- मुकुंद सपकाळे
1 min read

भारतीय लोकशाहीला वाचविण्यासाठी संविधान संमेलनाची आवश्यकता- मुकुंद सपकाळे

Loading

भारतीय लोकशाहीला वाचविण्यासाठी संविधान संमेलनाची आवश्यकता-मुकुंद सपकाळे

जळगांव प्रतिनिधी

भारतीय जनमानसामध्ये लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जागरूकता निर्माण झाली असून धर्मांधतेला पोषक वातावरण राजसत्तेकडून निर्माण होत असताना भारतीय लोकशाहीला वाचविण्यासाठी संविधान संमेलनाची गरज असल्याचे मत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष तथा संविधान संमेलनाचे निमंत्रक मुकुंद सपकाळे यांनी येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या संविधान संमेलनाच्या पूर्वतयारी बैठकीत बोलताना व्यक्त केले.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुकुंद नन्नवरे होते.
संविधान संमेलनाच्या अनुषंगाने भूमिका डॉ. मिलिंद बागुल यांनी मांडली प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी संमेलनात वैचारिक परिसंवाद,चर्चासत्र आयोजित करण्यात येण्यासंदर्भात विचार मांडले, मुकुंद नन्नवरे यांनी संविधान संमेलन हे देशहितासाठी असून पुढच्या पिढीसाठी लोकशाहीचा विचार करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. बापूराव पानपाटील,सचिन बिऱ्हाडे, उदय सपकाळे, आधार सपकाळे,राम पवार, जगदीश सपकाळे, भीमराव अडकमोल, प्रा. के. एल. हिरोळे, चेतन नन्नवरे, सुभाष सपकाळे, वाल्मिक जाधव यांनी संमेलन यशस्वीतेसाठी विचार मांडलेत,विजयकुमार मौर्य, गोपाळ भालेराव, दत्तू सोनवणे, धर्मरत्न मोरे, महेंद्र केदारे ,सोमा भालेराव, संजय सोनवणे,अनिल सुरडकर ,सुनील सोनवणे,आय.एस. वाघ, सुभाष साळुंखे, जयपाल धुरंधर, यशवंत घोडेस्वार,राजू सपकाळे, आनंदा तायडे,भारत सोनवणे,संतोष गायकवाड,अजय बिऱ्हाडे,दिलीप सपकाळे, व्हि.आर, भारुडे, कादर अली सैय्यद, यांनी सूचना मांडल्यात. बैठकीचे सूत्रसंचालन प्रीतीलाल पवार तर आभार जगदिश सपकाळे यांनी मानले.बैठकीत धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे यांना फोनवरून आलेल्या धमकीचा जाहीर निषेध करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *