युरिया टंचाईचा बनवाबनवी खेळ – किसान काँग्रेसचा मोर्चाचा इशारा! -प्रा सुभाष पाटील
1 min read

युरिया टंचाईचा बनवाबनवी खेळ – किसान काँग्रेसचा मोर्चाचा इशारा! -प्रा सुभाष पाटील

Loading

युरिया टंचाईचा बनवाबनवी खेळ – किसान काँग्रेसचा मोर्चाचा इशारा! -प्रा सुभाष पाटील

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या गरजांवर पाणी फिरवत युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. खत विक्रेते, वितरक, कृषी व महसूल खात्यांच्या भ्रष्ट युतीमुळे हा खेळ रचला जात असल्याचा आरोप किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील यांनी केला आहे.
व्यापारी मंडळी खताचे दर वाढण्याची वाट पाहत गोदामातील युरिया विक्री थांबवून बसले आहेत. त्यामुळे खरिपासाठी सज्ज असलेल्या शेतकऱ्यांची अडचण वाढली असून ही एकप्रकारची शेतकऱ्यांची लूट व अडवणूक असल्याचे पाटील यांनी ठणकावून सांगितले.

⏳ मोर्चाचा अल्टीमेटम:

30 जून 2025 पर्यंत युरिया विक्री सुरू न केल्यास 1 जुलै 2025 रोजी किसान काँग्रेस प्रत्येक गोडाऊनवर धडक मोर्चा नेईल आणि गरजूंना युरिया मिळवून देईल.
प्रशासनाने, कृषी विभाग, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महसूल खात्याने यामध्ये तात्काळ लक्ष घालून युरिया उपलब्ध करून द्यावा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर काळे फासण्याचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रा. सुभाष पाटील कार्याध्यक्ष, किसान काँग्रेस (जळगाव) यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *