राजश्री शाहू महाराज लोककल्याणकारी राजे – अरविंद सोनटक्के  देवगांव देवळी हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्ताने व्याख्यान
1 min read

राजश्री शाहू महाराज लोककल्याणकारी राजे – अरविंद सोनटक्के देवगांव देवळी हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्ताने व्याख्यान

Loading

राजश्री शाहू महाराज लोककल्याणकारी राजे – अरविंद सोनटक्के

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्ताने व्याख्यान

अमळनेर प्रतिनिधी – २६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हे उपक्रम युवा युवक कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असून बहुजन समाजाच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त प्रत्येक वर्षी विविध शाळांमध्ये वक्ते पाठवले जातात.
या वर्षी महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगाव देवळी येथे कार्यक्रमाचे शुभारंभ राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
कार्यक्रमाला मार्गदर्शन सेवानिवृत्त शिक्षक वक्ते अरविंद सोनटक्के यांनी केले. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचे सविस्तर विवेचन केले.
अरविंद सोनटक्के म्हणाले की राजर्षी शाहू महाराज समाज सुधारक, शिक्षणप्रेमी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे खांब होते. त्यांनी वस्तीगृहांची स्थापना केली, महिलांना स्वावलंबी बनवले, तसेच मुलांना शालेय शिक्षण मिळावे म्हणून नियम आखले. मुलं शाळेत येत नसल्यास दंडाची तरतूद करणारा हा एकमेव राजा होता. शेतकऱ्यांसाठी बंधारे व धरणे बांधले, सत्यशोधक चळवळ सुरु ठेवली, आणि आरक्षणाचा पाया उभा केला. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची पायाभरणी करणारे प्रमुख नेते म्हणजे राजर्षी शाहू महाराजच होते.
कोल्हापूरमध्ये अनेक शाळा, महाविद्यालये, आणि वसतिगृहे स्थापन केली. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठीही विशेष प्रयत्न केले आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांनी मराठी भाषेच्या प्रसारासाठीही खूप कार्य केले. त्यांनी शिक्षणासाठी अनेक शिष्यवृत्त्या दिल्या आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली.
विद्यार्थ्यांनीही या उपक्रमातून शाहू महाराजांच्या कार्याची माहिती घेत मनोगत व्यक्त केली. इयत्ता आठवीतील वेदीका पाटील, नववीतील श्रेया पाटील, अर्पिता बोरसे आणि कृष्णा पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक ए.जी. महाजन यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय.आर. महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन एस.के. महाजन यांनी केले. यावेळी स्काऊट शिक्षक एच.ओ. माळी यांनी फलक लेखन केले.
तसेच कर्मचारी देवेश पाटील, संभाजीराव पाटील व गुरूदास पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाहू महाराज यांचा आदर वाढण्यास मदत झाली असून, समाजातील सामाजिक न्याय आणि शिक्षणातील महत्त्वाचे पैलू याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *