एटी झांबरे माध्यमिक विद्यालयात सामाजिक न्याय दिवस व राजर्षी शाहू महाराज जयंती
![]()
एटी झांबरे माध्यमिक विद्यालयात
सामाजिक न्याय दिवस व राजर्षी शाहू महाराज जयंतीअमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दिनांक 26 जून 2025 गुरुवार रोजी एटी झांबरे माध्यमिक विद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन केले सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना शाहू महाराजांचे पोवाडे ऐकवण्यात आले तसेच रिया राय चंदे या विद्यार्थिनीने शाहू महाराजांचे जीवन कार्य व कुमारी स्नेहल पाटील या विद्यार्थिनींनी त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल माहिती सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मल चतुर यांनी केले तर प्रतिभा लोहार यांनी सामाजिक न्याय दिवस बद्दल माहिती दिली.त्याचप्रमाणे सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक नरेंद्र पालवे ,डी.ए.पाटील ए. एन. पाटील ,पुनम कोल्हे, रोहिणी पाटील, विवेक मोरे ,आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वर्षा चौधरी यांनी केले तर ईशान बडगुजर या विद्यार्थ्याने संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले

