अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा शासन आदेश पारित*
![]()
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना*
*अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा शासन आदेश पारित*
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आझाद मैदान मुंबई येथे 26 सप्टेंबर 2024 मध्ये प्रचंड आंदोलन करून आचासंहिता लागण्यापूर्वी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीसह प्रलंबित मागण्या शासनाने मंजूर कराव्यात अशी मागणी केली होती.
त्या आंदोलनाच्या अनुषंगाने राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 50 टक्के मानधन वाढ आणि दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची दि. 30 सप्टेंबर 2024 रोजी केली होती.
त्यानुसार सदर मानधनवाढ आणि प्रोत्साहन भत्ता दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्याबाबत दि. 4 ऑक्टोबर 2024 रोजी शासनाने आदेश काढला.सदर आदेशनुसार 80% पेक्षा अधिक अंगणवाडी सेविकांना 1600 रु ते 2000 रुपये तर मदतनीसांना 800 रु. ते 1000 रु. प्रोत्साहन भत्ता लागू यापूर्वी करण्यात आला होता.
परंतु सदर निकषमुळे बहुसंख्य सेविका मदतनीस प्रोत्साहन भत्ता मिळण्यापासून वंचित राहत होत्या. म्हणून संघटनेने वरील निकषांमध्ये बदल करावा यासाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता.
सदर पाठपुराव्याचा विचार करून शासनाने प्रोत्साहन भत्ता बाबतचे निकषंमध्ये सुधारणा केल्या असून त्या अनुषंगाने शासनाचे सह सचिव श्री. व्ही.आर.ठाकूर यांच्या सहीने दिनांक 24 जून 2025 रोजी सुधारित आदेश काढले आहेत.
सदर आदेशात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्ता बाबत खालील निकष नमूद केले आहेत.
*1) दरमहा किमान दोन सीबीई कार्यक्रम घेणे व पोषण ट्रॅकर वर करून नोंद करणे.*
*2) दरमहा नोंदणी झालेल्या एकूण लाभार्थी संख्येच्या 90 टक्के लाभार्थ्यांना 25 दिवस THR चे वाटप.*
*3)तीन ते सहा वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या 80 टक्के बालकांची किमान 16 दिवस उपस्थिती.*
*4) तीन ते सहा वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या 80 टक्के बालकांना दरमहा 21 दिवस आहाराचे वाटप.*
*5) दरमहा VHSND कार्यक्रमाचे आयोजन करणे व त्याची पोषण ट्रॅकर वर करून नोंद करणे.*
*6) अंगणवाडीतील सॅम व मॅम बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेले असणे.*
*7) SUW व MUW असलेल्या बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे.*
*8)पोषण ट्रॅकर वरील दरमहा अहवाल.*
*9) स्थूल व लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे.*
*10) खुजे बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे.*
असे नवीन निकष ठरविण्यात आले असून वरील दहा निकषांपैकी सात निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी सेविकेला 1400 रुपये ते दोन हजार रुपये आणि मदतनिसांना सातशे रुपये ते 1000 रुपये असा प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत आदेशात नमूद केले आहे. प्रोत्साहन भत्ता निकषांवर आधारित न ठेवता तो मानधनाला जोडण्यात येऊन मानधनासोबतच दरमहा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू अदा करावा.अशी मागणी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी केली आहे.

