महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे विशेष हिवताप जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न !… सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी -आर.के.देशमुख ( आरोग्य सेवक )
![]()
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे विशेष हिवताप जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न !…
सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी -आर.के.देशमुख ( आरोग्य सेवक )
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ग्रामीण रुग्णालय धरणगाव आयोजित विशेष हिवताप जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रास्ताविक शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख अतिथी धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे एस.आर.भंगाळे ( तालुका आरोग्य पर्यवेक्षक ), ए.एस.भोई ( आरोग्य निरीक्षक ) महेंद्र पंढरीनाथ माळी, आर.के. देशमुख ( आरोग्य सेवक ) उपस्थित होते. शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
विशेष हिवताप जनजागृती महिन्यानिमित्त जिल्हा हिवताप अधिकारी जळगाव डॉ.प्रमोदजी सोनवणे, डॉ.मनोज पाटील वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय धरणगाव, डॉ.संजय चव्हाण तालुका आरोग्य अधिकारी धरणगाव यांच्या मार्गदर्शनाने डेंग्यू, मलेरिया, झिका या सारख्या किटकजन्य आजारांची माहिती आर.के.देशमुख आरोग्य सेवक यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना विस्तृतपणे दिली आणि आपण सर्व विद्यार्थ्यांनी आपली काळजी घ्यावी. याप्रसंगी शाळेतील शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी ग्रामीण रुग्णालय धरणगाव च्या सर्व टीमचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी डी पाटील तर आभार एस व्ही आढावे यांनी मानले.

