अमळनेर नगरपालिका मार्फत महास्वच्छता, स्वच्छता शपथ व वृक्षारोपण अभियान
![]()
अमळनेर नगरपालिका मार्फत महास्वच्छता, स्वच्छता शपथ व वृक्षारोपण अभियान
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर नगर परिषदेत मार्फत नगर पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ भारत अभियान -स्वच्छ सर्वेक्षण २०२५ व माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत बोरी नदी पात्रात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन व सफाई अपनावो बिमारी भगावो उपक्रम अंतर्गत महास्वच्छता राबविण्यात आले. या अभियानांतर्गत बुधवारी, दि. २५.०६.२०२५ रोजी सकाळी ११.० वाजता शहरातील बोरी नदी पात्र, संत सखाराम महाराज मंदिर परिसर या ठिकाणी नगरपालिकेमार्फत परिसराची स्वच्छता करण्यात आली. सदर महास्वच्छता अभियान राबवितांना नगरपरिषदेचे कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचे मार्फत बोरी नदीपात्र मधील प्लास्टिक, कागद, बांधकाम कचरा, निर्माल्य ई. मोठ्या प्रमाणात जमा करण्यात आले. अमळनेर शहरात दरवर्षी संत सखाराम महाराज यात्रा उत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणात नदीपात्रात कचरा निर्माण होत असतो. यापूर्वीही सदर कचरा पालिकेमार्फत स्वच्छ करण्यात आला होता. तथापि पावसाळ्याला सुरुवात झालेली असून नदीपात्राची स्वच्छता करणे गरजेचे असल्याने पालिके मार्फत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर अभियानादरम्यान अडीच टन कचरा जमा करण्यात आला. तसेच तांबेपुरा, शिवशक्ती चौक येथील खुल्या भूखंडावर मुख्वृयाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी उपस्थित कर्मचारी सर्व सफाई कर्मचारी, मुकादम यांना स्वच्छतेबद्दल तसेच आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशवीचा वापर करणे, तसेच नगरपालिकेमार्फत पुरविण्यात आलेल्या संरक्षण साहित्य यांचा काम करताना जास्तीत जास्त वापर करून आपले आरोग्य कसे चांगले राखता येईल याबद्दलहि मुख्याधिकारी यांनी मार्गदर्शन केले. नुकतेच नगर पालिकेने नगर पालिका माध्यमिक शाळेचे नुतनीकरण केले असून जास्तीत जास्त सफाई कर्मचारी यांनी आपल्या मुलांना न. प. शाळेत दाखल करून चांगले शिक्षण घेणे कामीही मुख्याधिकारी यांचे कडून आवाहन करण्यात आले. यावेळी नगर पालिके मार्फत उपस्थित सर्वांना स्वच्छता व हरित शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रमास नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे, प्रभाग मुकादम पुनमचंद संदानशिव, सोमनाथ संदानशिव, राहुल संदानशिव, गौतम बिऱ्हाडे व अधिनस्त सर्व सफाई कर्मचारी, शहर समन्वयक गणेश गढरी, श्याम करंदीकर, अनंत संदानशिव, सतीश बिऱ्हाडे, महेंद्र बिऱ्हाडे, युनुस शेख, महिला हौसिंग ट्रस्टचे महिला पदाधिकारी व पर्यावरण सखी, परिसरातील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

