मराठा महिला मंडळाची अभिवाचन स्पर्धा: आत्मविश्वास व बुद्धिमत्तेचा उत्सव!,  विजेत्या महिलांना सन्मान व मिळाली प्रेरणादायक बक्षिसे
1 min read

मराठा महिला मंडळाची अभिवाचन स्पर्धा: आत्मविश्वास व बुद्धिमत्तेचा उत्सव!, विजेत्या महिलांना सन्मान व मिळाली प्रेरणादायक बक्षिसे

Loading

मराठा महिला मंडळाची अभिवाचन स्पर्धा: आत्मविश्वास व बुद्धिमत्तेचा उत्सव!

विजेत्या महिलांना सन्मान व मिळाली प्रेरणादायक बक्षिसे

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) –
मराठा महिला मंडळाच्या वतीने आयोजित अभिवाचन स्पर्धा नुकतीच मराठा मंगल कार्यालयात यशस्वीपणे पार पडली. महिलांच्या बौद्धिक व विचारशक्तीला चालना देणाऱ्या या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. महिला वर्गातील अनेकांनी या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला यामुळे मंडळाच्या कार्यकारिणीला अत्यंत आनंद झाला.
स्पर्धेचा आयोजनात्मक भाग सौ.लीना पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन सौ.मनीषा पाटील यांनी सुंदरपणे सांभाळले. परीक्षक म्हणून सानेगुरुजी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका
श्रीमती अनिता बोरसे व सौ.पूजा शहा यांनी अभिवाचनाचे मूल्यांकन अत्यंत काटेकोरपणे केले. नावनोंदणी व बॅच वितरण सौ.रागिनी पाटील यांच्याकडून झाले, तसेच परीक्षकांचा परिचय सौ.प्रभा पवार यांनी दिला. मंडळाच्या अध्यक्षा प्रा.शीला पाटील यांनी मंडळाचा उद्देश स्पष्ट करत सांगितले की, हा मंडळ गृहिणींना चालते-बोलते विद्यापीठ बनून त्यांना सतत शिकायला व विकसित होण्यासाठी संधी देते. अशा प्रकारच्या बौद्धिक कार्यक्रम आणि स्पर्धा दर महिन्याला आयोजित केल्या जातील.

प्रत्येक स्पर्धकाला 3+1 मिनिटे अभिवाचनासाठी वेळ देण्यात आला होता. महिलांनी विविध पुस्तके व साहित्यातून सुंदर उतारे तयार करून सादर केले, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात एक मनोवेधक वातावरण निर्माण झाले. अमळनेरमधील सर्वात मोठ्या व जास्त सभासद असलेल्या मराठा महिला मंडळासाठी महिला वर्गाने महिन्यातून किमान एक तास वेळ काढून अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा अशी विनंती मंडळाने केली.

आजच्या स्पर्धेतील विजेत्यांची यादी:
1) सौ. रेखा मराठे
2) सौ. स्वाती पाटील
3) सौ. विद्या अहिरे

याशिवाय यांना मिळाली उत्तेजनार्थ बक्षिसे 
1) प्रा. सौ. श्वेता पाटील
2) सौ. पल्लवी पाटील
3) सौ. जयश्री पाटील

या सर्व बक्षीसप्राप्त महिलांचे मंडळाने मनापासून अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी माधुरी पाटील यांनी सगळ्यांचे आभार मानले तर सौ. तिलोत्तमाताई पाटील यांनी सर्वांचे कौतुक केले. सौ. सुनीता पाटील, सौ. सुलोचना वाघ आणि सौ. मंगला पाटील यांनीही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उत्तम मदत केली.
अशी संस्कृती, बौद्धिकता व एकात्मता वाढवणारी उपक्रम मराठा महिला मंडळाच्या पुढील वाटचालीत नक्कीच मोठे स्थान मिळवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *